Mayank Yadav : LSG साठी आनंदाची बातमी! स्टार खेळाडू संघात दाखल

Mayank Yadav comeback in LSG for IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्ससाठी दिलासादायक बातमी आली आहे. त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापतीतून सावरल्यानंतर संघात सामील झाला आहे. मयंक लवकरच मैदानात परतू शकतो असे मानले जात आहे. लखनौने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आणि मयंक संघात सामील झाल्याची माहिती दिली.
लखनौची कामगिरी आतापर्यंत संमिश्र राहिली आहे आणि मयंकचे पुनरागमन त्यांच्यासाठी दिलासादायक आहे. दुखापतीमुळे मयंक आतापर्यंत भारतीय संघातून आणि आयपीएल २०२५ पासून बाहेर होता. त्याने बंगळुरू येथील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण केली आणि मंगळवारी रात्री टीम हॉटेलमध्ये पोहोचला. १९ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यासाठी मयंक उपलब्ध असेल असे सांगितले जात आहे.
🚨 GOOD NEWS FOR LUCKNOW 🚨
– Mayank Yadav is likely to join the LSG squad tomorrow. [Sports Tak]#mayankyadav #ipl2025 #lucknowsupergiants #Lsg pic.twitter.com/Xg0uwhfrho— Diptiman Yadav (@diptiman_6450) April 16, 2025
गेल्या हंगामात खेळले होते चार सामने –
DELHI EXPRESS🚄 HAS BACK TO LUCKNOW AND READY TO JOIN LSG CAMP ❤️🔥❤️🔥 #MayankYadav #LSG#TATAIPL2025pic.twitter.com/RKvG4jD1Si
— Hitman45 (@45Rohit_sharma) April 16, 2025
२०२३ च्या हंगामात मयंक दुखापतीमुळे बाहेर होता, परंतु गेल्या हंगामात त्याने पंजाब किंग्जविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर, त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धच्या पुढच्या सामन्यातही तीन विकेट्स घेतल्या, ज्यामुळे त्याला सलग दोन सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला. परंतु, त्याची मोहीम फक्त चार सामन्यांपुरती मर्यादित राहिली.
हेही वाचा – PBKS VS KKR : युजीच्या भेदक माऱ्यासमोर कोलकाताच्या फलंदाजांनी टाकली नांगी
मयंक यादवला साईड स्ट्रेनची दुखापत –
कारण त्याला साईड स्ट्रेनमुळे पुढे खेळता आले नाही. गेल्या हंगामात बहुतेक वेळ बाहेर राहूनही, लखनौ फ्रँचायझीने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि मेगा लिलावापूर्वी मयंकला ११ कोटी रुपयांना कायम ठेवले. मयंकने गेल्या आयपीएल हंगामात ताशी १५५ किमी वेगाने गोलंदाजी करून आपली छाप सोडली होती.





