Gautam Gambhir Pitch : “फक्त चौकार-षटकारच पाहायचेत का?”; २५० धावा चेस झाल्यानंतर गंभीर भडकला; सपाट खेळपट्ट्यांवर उपस्थित केला सवाल
Gautam Gambhir Pitch : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात ५०० हून अधिक धावा झाल्या. खेळपट्टी गोलंदाजांना अजिबात मदत करत नसल्याने, वेस्ट इंडिजने २५० धावांचे लक्ष्य सहज पार केले.

Gautam Gambhir Bat Ball Balance Pitch Demand after IND vs WI 2nd T20I : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेत धावांचा महापूर पाहायला मिळत असून गोलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडत आहे. रांचीतील दुसऱ्या टी-२० सामन्यात विंडीजने २५० धावांचे अशक्यप्राय लक्ष्य सहज पार करत टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील धावांचा पाठलाग करताना दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला. भारताच्या या ऐतिहासिक पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी क्रिकेटमधील बॅट आणि बॉलच्या संतुलनावर परखड मत मांडत, केवळ फलंदाजांच्या बाजूने झुकणाऱ्या सपाट खेळपट्ट्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“केवळ चौकार-षटकार नकोत; चेंडू अन् बॅटमध्ये बरोबरीची लढत हवी!”
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गंभीर म्हणाला, “तुम्हाला बॅट आणि बॉल यांच्यात चुरशीची लढत पाहायला नको आहे का? जर लोकांना फक्त चौकार आणि षटकारच पाहायचे असतील तर ठीक आहे. पण जर खरोखर दर्जेदार क्रिकेट अनुभवायचे असेल, तर दोन्ही बाजू समान ताकदीने लढल्या पाहिजेत. खेळात संतुलन राखले तरच खेळाचा दर्जा अधिक उंचावेल.”
गोलंदाजांची पाठराखण; कारकीर्द पणाला लागल्याची जाणीव!
🔴REMEMBER, WE ARE WORLD CHAMPIONS – GAUTAM GAMBHIR🤯
GG🎙️: India may be struggling with bowling on flat pitches & in dew, but We still believes the team must keep improving & find ways to perform even in tough conditions. 🇮🇳 https://t.co/0PcX3tJAX8
— Sam (@cricsam02) October 10, 2026
महागड्या ठरलेल्या गोलंदाजांची पाठराखण करताना गंभीरने स्पष्ट केले की, हे गोलंदाजही खूप कष्ट करून ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचले आहेत आणि त्यांची कारकीर्दही तितकीच महत्त्वाची आहे. दवाचे साम्राज्य आणि सपाट खेळपट्टीवर गोलंदाजी करणे कठीण असले, तरी पहिल्याच षटकात दोन आणि पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स टिपल्यानंतर विरोधी संघाला रोखण्याचे मार्ग भारतीय गोलंदाजांनी शोधायला हवे होते, असेही त्याने नमूद केले.
मयंक यादवच्या वेगाचे कौतुक; १४९.५ किमीच्या चेंडूवर उडवला त्रिफळा!
पराभवानंतरही गंभीरने युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवच्या भेदक माऱ्याची भरभरून प्रशंसा केली. मयंकने १४५ पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत ३ विकेट्स टिपले; विशेषतः रोव्हमन पॉवेलला त्याने १४९.५ किमी प्रतितास वेगाच्या चेंडूवर थेट त्रिफळाचीत केले. फास्ट बॉलरने स्वतःच्या ताकदीवर पूर्ण वेगानेच मारा करायला हवा आणि मयंकने ती भूमिका चोख बजावली, असे गंभीरने सांगितले.





