‘मविआ’चा एल्गार ! निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत निघणार ‘सत्याचा मोर्चा’;कोणते नेतेमंडळी होणार सहभागी?

Mahavikas Aghadi Mumbai Morcha | महाविकास आघाडी आणि मनसेकडून आज मुंबईत मतदारयाद्यांमधील घोळ आणि मतचोरीविरोधात ‘सत्याचा मोर्चा’ निघणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्वत्र बॅनर आणि पोस्टर्स आणि सर्वपक्षीय झेंडे लावण्यात आले आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे देखील या मोर्चात दिसणार आहेत. याशिवाय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.
निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत हा मोर्चा काढण्यात येत आहे. मत चोरी, दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ या सगळ्याची पुरावे राज्य निवडणूक आयोगाला देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा मोर्चा काढण्यात येत आहे. Mahavikas Aghadi Mumbai Morcha |
मोर्चाचे नियोजन कसे असणार?
मोर्चा दुपारी 1 वाजता मुंबईतील फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर 4 वाजता थांबेल. मुंबई महापालिका मुख्यालय या ठिकाणी प्रत्येक पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची भाषण होतील. मोर्चाची वातावरण निर्मिती म्हणून राज ठाकरेंनी नुकताच रंगशारदा सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेत मतदारयंत्र, मतदार याद्यांसंदर्भात प्रेझेन्टेशनही केलं होतं. तसंच मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं. Mahavikas Aghadi Mumbai Morcha |
विरोधकांच्या मागण्या –
- मतदारयाद्या अद्ययावत करा
- मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा
- ७ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा
- जोपर्यंत मतदार याद्या अपडेट होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका.
समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काही काँग्रेसच्या बड्या नेत्यांची या मोर्चाला अनुपस्थिती राहण्याची शक्यता आहे. परंतु विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नसीम खान हे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असल्याचे म्हंटले जात आहे.
हेही वाचा:




