Devendra Fadnavis : “एकदा नाहीतर रोज रामरक्षा म्हणावी…”; देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका
फडणवीस म्हणाले, मला आनंद आहे शेवटी उद्धव ठाकरेंना राम आठवले. आमची अपेक्षा एव्हढीच होती की, उद्धव ठाकरेंना राम आठवले पाहिजेत.

Devendra Fadnavis | Uddhav Thackeray – मला आनंद आहे शेवटी उद्धव ठाकरेंना प्रभू श्रीराम आठवले. राम मार्गाने चालले तर उद्धव ठाकरेंचे भलं होईल. केवळ एकदा नाहीतर रोज रामरक्षा म्हणावी, ही माझी अपेक्षा आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
चंद्रपूर येथे प्रसारमाध्यमांशी ते संवाद साधत होते. फडणवीस म्हणाले, मला आनंद आहे शेवटी उद्धव ठाकरेंना राम आठवले. आमची अपेक्षा एव्हढीच होती की, उद्धव ठाकरेंना राम आठवले पाहिजेत.
उद्धव ठाकरेंनी रामाचा मार्ग सोडल्याने त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. राम मार्गाने चालले तर उद्धव ठाकरे यांचे चांगले होईल. केवळ एकदा नाहीतर रोज रामरक्षा म्हणावी, ही माझी अपेक्षा आहे, असा टोला त्यांनी लगाविला.
राज्यव्यापी ‘रामराम रक्षा’ आंदोलनाची घोषणा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राज्यव्यापी ‘रामरक्षा आंदोलन’ छेडण्याची मोठी घोषणा केली.
मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा करत भाजपवर जोरदार टीका केली आणि हा केवळ राजकीय नव्हे तर श्रद्धा आणि हिंदूंच्या भावनांशी संबंधित मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.





