Maruti Hike Car Price: मारुती स्विफ्ट कार घेण्याचा विचार करणाऱ्यांना मारुती सुझुकीने धक्का दिला आहे. ही कंपनीची सर्वात लोकप्रिय कार आहे. कंपनीने या प्रकारातील सर्व कारची किंमत 15 हजार ते 39 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. कंपनीने ही किंमत अशावेळी वाढवली आहे जेव्हा कंपनी पुढील महिन्यात स्विफ्ट कारचे नवीन व्हर्जन लॉन्च करणार आहे.
इतकी किंमत वाढली –
मारुतीने LXI ची 25 हजार रुपये, VXI वर 15 हजार रुपये, VXI AMT वर 15 हजार रुपये, ZXI वर 25 हजार रुपये, ZXI AMT वर 25 हजार रुपये, ZXI+ वर 39 हजार रुपये, ZXI+ AMT वर 25 हजार रुपये, VXI CNG वर 15 हजार आणि ZXI CNG वर 25 हजार रुपयांची वाढ केली आहे.
पुढील महिन्यात नवीन स्विफ्ट होणार लाॅंच –
यावेळी नवीन स्विफ्टच्या डिझाईनमध्ये खूप नवीनता पाहायला मिळणार आहे. कारला नवीन बोनेट, बंपर, हेडलाइट्स, फ्रंट ग्रिल, डिझाइन आणि मागील लूकमध्ये बदल देखील मिळेल. याशिवाय केबिनचे डिझाइन पूर्णपणे बदलले जाणार आहे. अनेक नवीन फीचर्सचाही समावेश करण्यात येणार आहे. यावेळी तुम्हाला नवीन स्विफ्टमध्ये मोठा डिस्प्ले मिळेल. नवीन स्विफ्टचे इंजिन पुन्हा ट्यून केले जाईल. पुढील महिन्यात नवीन स्विफ्ट कार लाॅंच होणार आहे.