‘मालेगाव फाईल्स’ सिनेमा झाला पाहिजे, कारण काँग्रेसने फेक नेरटीव्ह पसरवले होते…; भाजप खासदाराची मागणी

Malegaon Files | मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींपैकी एक असलेले कर्नल प्रसाद पुरोहित यांचे पुण्यात जंगी स्वागत करण्यात आले. पुरोहित यांच्या उपस्थितीत शोभायात्रा देखील काढण्यात आली होती. या स्वागत समारंभाला मेधा कुलकर्णी हजर होत्या. त्यावेळी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी काश्मीर फाईल्ससारखा ‘मालेगाव फाईल्स’ हा सिनेमाही झाला पाहिजे अशी मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून भाजपसह महायुतीमधील नेते काँग्रेसवर टीका करत आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात हिंदुत्त्ववाद्यांना जाणीपूर्वक अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे भाजप नेत्यांनी म्हटलं. Malegaon Files |
त्यावरुन, राजकीय टीका सुरू असतानाच खासदार मेधा कुलकर्णी यांनी मोठी मागणी केली आहे. काँग्रेसने त्यांच्या काळात फेक नेरटीव्ह पसरवले होते, त्यांचे पितळ उघडं पाडण्यासाठी मालेगाव फाइल्स हा सिनेमाही आलाच पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे. Malegaon Files |
काय आहे प्रकरण?
दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची तब्बल 17 वर्षांनंतर सुनावणी पूर्ण झाली. 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने मोठा निर्णय देत सर्व 7 आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, अजय रहीरकर, सुधाकर धर द्विवेदी उर्फ शंकराचार्य आणि समीर कुलकर्णी यांना न्यायालयाने दोषमुक्त केले. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. Malegaon Files |
हेही वाचा :
Shirur News | वृद्ध महिलेकडील दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार..





