Shirur News | वृद्ध महिलेकडील दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार..

प्रभात वृत्तसेवा
शिरूर – शिरूरच्या रामलिंग रोडवरील ओसेसीस कॉलनीतील वर्दळीच्या भागात भरदिवसा सोनसाखळी चोरीचा धक्कादायक प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार, दोन अनोळखी इसमांनी एक वृद्ध महिला फसवून तिच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.
छाया आनंद सातारकर (वय ६५, रा. ओयेसीस कॉलनी, रामलिंग रोड, शिरूर) या नेहमीप्रमाणे आनंतविहार बंगल्याजवळ फुले तोडत असताना हा प्रकार घडला. (दि.२) रोजी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अंदाजे ३०-३५ वयोगटातील दोन चोरट्याने पत्ता विचारला. चोरटे पुढे जाऊन पुन्हा वळसा घेत आणखी एकदा तिच्याजवळ येत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. तपास पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.





