मलायका अरोरा मिस्ट्री मॅनसोबत एअरपोर्टवर स्पॉट; व्हिडिओ व्हायरल

Malaika Arora | अभिनेत्री मलायका अरोराचे अर्जुन कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर आता तिचे नाव आणखी एका तरुणासोबत जोडले जात आहे. मुंबईतील एका म्युझिक कॉन्सर्टनंतर आता या दोघांना एअरपोर्टवर एकत्र पाहिलं गेलं आहे. मलायका या मिस्ट्री मॅनमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात मलायका अगदी कॅज्युअल लूकमध्ये एअरपोर्टवर दिसली. यावेळी तिच्यासोबत एक व्यक्ती होता. हे दोघं एकाच टर्मिनलमधून बाहेर पडले, तेव्हा पापाराझींनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. ज्याने मास्क लावला होता आणि त्याने आपला चेहरा दाखवला नाही.
पापाराझींसमोर मलायका आणि हर्षने एकमेकांसोबत चालणं टाळलं. त्यामुळे मलायका पुढे निघून आली आणि हर्ष तिच्या मागून चालत होता. विशेष म्हणजे पार्किंगच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आधी मलायका एका कारमध्ये बसली आणि काही क्षणांनंतर हर्षसुद्धा त्याच कारमध्ये बसल्याचं पाहायला मिळालं. व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या आणि प्रत्येकजण या मिस्ट्री मॅनबद्दल अंदाज लावत आहे.
View this post on Instagram
याआधी 29 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एनरिक इग्लेसियासच्या कॉन्सर्टमध्ये या दोघांना पहिल्यांचा एकत्र पाहिलं गेलं होतं. दरम्यान, या तरुणाचे नाव हर्ष मेहता सांगितले जात आहे. हर्ष आणि मलायका यांच्या वयात तब्बल 17 वर्षांचं अंतर आहे. तर मलायका 50 वर्षांची आहे. 33 वर्षांचा हर्ष हा हिरे व्यापारी असल्याचं समोर आले आहे.
मलायका किंवा हर्ष यांनी अद्याप त्यांच्या डेटिंगच्या चर्चांवर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मलायकाने अभिनेता अरबाज खानशी लग्न केलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर 2018 मध्ये अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती, मात्र गेल्या वर्षी या दोघांचा ब्रेकअप झाला. Malaika Arora |
हेही वाचा:
शिवसेना आणि मनसेची युती होणार? उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल





