King Film: शाहरुख खान-करिना कपूर 15 वर्षानंतर एकत्र; ‘डॅडी कूल’ नवं गाणं रिलीज
King Film: सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'किंग' चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार

King Film: अभिनेता शाहरुख खान सध्या ‘किंग’ या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील पहिलं गाणं ‘तू मिल जाए’ काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं. यामध्ये त्याची दीपिका पादुकोणसोबत पुन्हा जबरदस्त केमिस्ट्री दिसली. तर आता शाहरुख बऱ्याच वर्षांनी करीना कपूरसोबत स्क्रीनवर दिसला आहे. ‘किंग’मधलंच दुसरं गाणं ‘डॅडी कूल’ नुकतंच रिलीज झालं आहे.
शाहरुखने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हे गाणे शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ‘बेबोसोबत पुन्हा एकदा… ओल्ड स्कूल गाणं, पण तरीही कूल आहे! डॅडी कूल’, अशा शब्दांत त्याने गाण्याची ओळख करून दिली.
या गाण्यात शाहरुख खान आणि करीना कपूर खान यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मुंबईत आयोजित एका विशेष इन्स्टाग्राम इव्हेंटमध्ये या गाण्याचे लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी शाहरुख आणि करीना एकत्र उपस्थित होते. तब्बल १५ वर्षांनंतर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र आल्याने चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. यातील त्यांची केमिस्ट्री पाहून पुन्हा ‘रा-वन’मधील ‘छम्मक छल्लो’ गाण्याची आठवण झाली आहे.
शाहरुख खान आणि करीना कपूर खान यांची जोडी याआधी २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रा.वन’ चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील ‘चम्मक छल्लो’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. आता ‘किंग’ चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आली आहे. त्यामुळे ‘डॅडी कूल’ गाण्याची चाहत्यांमध्ये विशेष चर्चा रंगली आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ हा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, जयदीप अहलावत, अर्शद वारसी आणि राघव जुयाल यांसारखे कलाकार दिसणार आहेत.
हेही वाचा:
Nevasa : भेंडा बुद्रुकच्या स्मशानभूमीची दयनीय अवस्था; नागरिकांनी व्यक्त केला संताप





