Posted by Amitabh Bachchan : हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅायकॅानिक चित्रपट म्हणून ‘शोले’ चित्रपटाकडे पाहिले जाते. या चित्रपटातील ‘जय आणि वीर’च्या जोडीने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले. १९७५ साली प्रदर्शित झालेला शोले चित्रपट आजही टेलिव्हिजनवर लावण्यात आला, तर तितक्याच उत्सुकेतने बघितला जातो. हीच तर या चित्रपटाला सर्वात मोठी पोचपावती आहे. या चित्रपटाने अनेक रेकॅार्ड रचले असले, तरी ‘शोले’मध्ये अभिनेते अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या जोडीने शोले हिट केला. पण सोमवारी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी बॅालिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली. ही मॅन म्हणून ओळखले जाणरे धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने बॅालिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर बॅालीवूडमधील सेलिब्रिटी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत पोस्ट शेअर करत आहेत. धर्मेंद्र यांचे अत्यंत जवळेचे मित्र किंबहुना त्यांचे धाकटे भाऊ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे. धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर सोमवारी मध्यरात्री बिग बींनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. आणखी एक धाडसी आख्यायिका आपल्याला सोडून गेली आहे. एक असह्य शांतता मागे सोडून गेली आहे. धरमजी….महानतेचे प्रतीक.. केवळ त्यांच्या प्रतिष्ठेसाठीच नाही तर त्यांच्या मनातील विशालता आणि अत्यंत प्रेमळ, साधेपणासाठी ते कायम लक्षात राहतील, अशा शब्दांत अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. T 5575 – … another valiant Giant has left us .. left the arena .. leaving behind a silence with an unbearable sound .. Dharam ji .. 🙏 🙏🙏 .. the epitome of greatness, ever linked not only for his renowned physical presence, but for the largeness of his heart , and its… — Amitabh Bachchan (@SrBachchan) November 24, 2025 पंजाबच्या गावच्या मातीतील सुगंध त्यांनी आपल्यासोबत आणला होता आणि त्या मातीशी ते कायम प्रामाणिक राहिले. ही इंडस्ट्री प्रत्येक दशकात बदलत होती, पण ते कधीच बदलले नव्हते. त्यात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांचं हास्य, त्यांच्या स्वभावातील उब, त्यांचं आकर्षक सभोवतालच्या प्रत्येकापर्यंत पोहोचली. हे या इंडस्ट्रीत फार दुर्मिळ आहे. त्यांच्या जाण्याने आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना अमिताभ बच्चन यांनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते हि मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू होते. डॅाक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला होता. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून घरी आणण्यात आले. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली असून, त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी बॅालीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. हेही वाचा : “गुंड आणि टोळ्या सांभाळणारा माणूस जनतेसाठी घातक”; धनंजय मुंडेंनी वाल्मीक कराडची आठवण काढताच जरांगे कडाडले