Malaika Arora : “मी खूप रोमँटिक आहे, मला दुसरं लग्न नेहमीच आवडेल…”; मलायका अरोरा पुन्हा अडकणार लग्न बंधनात
Malaika Arora : बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अरबाज खानसोबतच्या लग्नानंतर जवळपास दोन दशकं एकत्र राहूनही हे नातं पुढं टिकू शकलं नाही. 2016 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर 2017 मध्ये दोघांनी अधिकृतरीत्या घटस्फोट घेतला. मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते.
दरम्यान, अभिनेत्री मलायकाने अनेकदा या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी मन मोकळं केलं. यावेळी मलायकाने दुसऱ्या लग्नावर देखील स्वतःचं मत स्पष्ट केलं आहे. सध्या अभिनेत्रीची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दुसऱ्या लग्नाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मला माझं दुसरं लग्न नेहमीच आवडेल, पण जेव्हा मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनी मला प्रश्न विचारला. ‘पण आज मी आनंदी आहे. मी हा निर्णय घेतल्याबद्दल मला आनंद आहे. जेव्हा मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला स्वार्थी म्हटलं गेलं. पण मी कायम स्वतःला प्राधान्य दिलं’.
समाज म्हणतो की आधी तुम्ही तुमच्या मुलाचा, पतीचा आणि नंतर स्वतःचा विचार केला पाहिजे. पण मी आधी स्वतःचा विचार केला. आज मी पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आहे. मी म्हणेन की लवकर लग्न करू नका. आधी स्वतःला समजून घ्या आणि काहीतरी करा किंवा व्हा, नंतर लग्नाचा निर्णय घ्या. आयुष्याचा आनंद घ्या आणि जेव्हा तुम्हाला सर्वकाही समजेल तेव्हाच लग्नासाठी तयार व्हा…’ असा सल्ला अभिनेत्रीने दिला आहे.
View this post on Instagram
पुढे मलायका हिला दुसऱ्या लग्नाबद्दल देखील विचारण्यात आलं. तेव्हा अभिनेत्रीने दुसऱ्या लग्नासाठी होकार दिला. मी खूप रोमँटिक आहे आणि दुसऱ्या लग्नाला मी कधीही नाही म्हणणार नाही. असं सांगून मलायकानं स्पष्ट केलं की तिला दुसऱ्यांदा सेटल होण्यास तिला कोणतीही अडचण नाही.” असा देखील मलायका यावेळी म्हणाली.
मलायकाच्या आयुष्याबद्दल थोडक्यात….
अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यातील नात्यात दुरावा आला आहे का अशी देखील चर्चा अधूनमधून होत असते. अरबाज आणि मलायका यांचे वैवाहिक जीवन आठ वर्ष सुरू होते. पण दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अरबाज खानबद्दल बोलायचं झालं तर, त्याने 2023 मध्ये शूरा खानशी लग्न केलं आहे.
अभिनेत्री मलायकाला ‘छैय्या छैय्या..’ गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मलायका ही फॅशन शोचे परीक्षण करते. मलायका 51 वर्षांची आहे पण ती फिटनेसमध्ये आजच्या अभिनेत्रींशी स्पर्धा करू शकते. मलायकाचे वय वाढत आहे पण तिचे सौंदर्य आणि फिटनेस वाढत आहे. ती अधिक सुंदर होत चालली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाखोंच्या घरात चाहते आहेत. तिचे बोल्ड फोटो-व्हिडिओ नेहमीच चाहत्यांची धडधड वाढवत असतात.





