सातारा -जिल्ह्यात काल (दि. 26) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार, आणखी 595 नागरिक करोनाबाधित झाले असून, नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी शुक्रवारी दिली. सलग दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्हिटी रेट आणि मृतांचे प्रमाण स्थिर राहिल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 608 नागरिकांना घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि त्यापुढे कंसात आजअखेर बाधित रुग्णांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे – सातारा 160 (48924), फलटण 128 (34426), कोरेगाव 72 (20822), खटाव 70 (23980), माण 43 (16678), कराड 42 (37606), वाई 22 (15288), खंडाळा 18 (13770), पाटण 16 (9909), जावळी 13 (9791), महाबळेश्वर 3 (4579) व इतर 8 (1876), असे आजपर्यंत एकूण दोन लाख 37 हजार 649 करोनाबाधित आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये मृत्यू झालेल्या बाधितांची तालुकानिहाय संख्या आणि त्यापुढे कंसात आजपर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे – कराड 2 (1157), कोरेगाव 2 (454), फलटण 1 (670), जावळी 1 (215), खंडाळा 1 (190), खटाव 1 (594), माण 1 (376), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (363), सातारा 0 (1435), वाई 0 (356) व इतर 0 (78), असे आजअखेर जिल्ह्यात एकूण पाच हजार 976 करोनाबळी झाले आहेत.