Inspector Zende : महाराष्ट्राची हास्यजत्राफेम अभिनेत्याला मिळाली मोठी संधी! थेट मनोज बाजपेयीसोबत अॅानस्क्रिन दिसणार

Inspector Zende : नुकताच अष्टपैलू अभिनेता मनोज बाजपेयी याची मुख्य भूमिका असलेली इन्स्पेक्टर झेंडे नावाची वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिरीजमध्ये मनोज यांच्यासोबत मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांची मोठी फौज दिसणार आहे. याच कलाकारांमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचं नशिब फळफळलं असून तो अभिनेता आता या सिरीजमध्ये थेट मनोज यांच्यासोबत अॅानस्क्रिन पाहायला मिळणार आहे.
सत्य घटनेवर आधारित ‘इन्स्पेक्टर झेंडे’ ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटीवर रिलीज होणार आहे. या सिरीजमध्ये अभिनेता मनोज बाजपेयी हा मधुकर झेंडे या मराठमोळा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिरीजचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून मोठी चर्चा सिरीजविषयी केली जात आहे.
या सिरीजमध्ये भाऊ कदम, गिरीजा ओक आणि हरीश दूधाडे हे मराठी कलाकार असून याशिवाय आणखी एक मराठी कलाकार आहे, त्याच नाव हास्यजत्रा फेम ओंकार राऊत. यामुळे आता या सिरीजमध्ये त्याची भूमिका कशी असणार याचं उत्तर ही सिरीज प्रदर्शित झाल्यावरच मिळणार आहे.
मधुकर झेंडे यांनी 1971 मध्ये पहिल्यांदा शोभराजला अटक केली. त्याकाळी हा मोठा पराक्रम मानला गेला होता. त्यावेळी झेंडेंच्या पराक्रमाच्या सर्वत्र चर्चा होऊ लागल्या. चार्ल्स शोभराज हा आंतरराष्ट्रीय कुख्यात गुन्हेगार आणि सीरीयल किलर होता, या सत्यघटनेवर आधारित इन्स्पेक्टर झेंडे या सिरीजचं कथानक रचलेलं आहे.
ही सिरीज ५ सप्टेंबर रोजी नेटफिक्ल्सवर प्रदर्शित होणार आहे. या सिरीजचं दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरनं केलं आहे. तर, निर्मिती ओम राऊत आणि जय शिवकरणमणी यांची आहे.





