Radhika Apte : “माझा देवावर विश्वास नाही, मूर्तीपेक्षा निसर्गावर श्रद्धा ठेवावी”; राधिका आपटेने व्यक्त केलं मत
Radhika Apte : राधिका नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.

Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटेची ‘अक्का’ ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिनेत्री कीर्ती सुरेशचीही मुख्यभूमिका आहे. या सीरिजच्या प्रमोशनमध्ये सध्या दोघीही व्यस्त आहेत.
एका मुलाखतीदरम्यान, राधिकाने तिचा देवावर विश्वास नसल्याचा खुलासा केला. तसेच लोकांनीही मूर्तीपेक्षा निसर्गाला जपावं, असे आवाहनही तिने केले.
एका मुलाखतीत ‘अक्का’ सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री किर्ती सुरेशला व तिला तुमचा देवावर विश्वास आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राधिक म्हणाली, “माझा देवावर विश्वास नाही. माझा निसर्गावर विश्वास आहे. माझ्यासाठी निसर्ग हीच सगळ्यात मोठी शक्ती आहे.
माझी अशी इच्छा आहे की लोकांनी मूर्तीपेक्षा निसर्गावर श्रद्धा ठेवावी.” तर अभिनेत्री कीर्ती सुरेश म्हणाली, “माझा देवावर विश्वास आहे. एक कोणतीतरी दैवी शक्ती नक्कीच आहे. माझी देवावर श्रद्धा आहे. मी मला जी पद्धत माहितीये त्याप्रमाणे मी प्रार्थनाही करते. पण मी धार्मिक नाही.” दरम्यान, राधिका तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती नेहमी तिची मतं ठामपणे व्यक्त करत असते. Radhika Apte
महिलांचं साम्राज्य असलेली रंजक कथा
‘अक्का’ सीरिज ही १९८० दशकातील पेरनुरु नावाच्या काल्पनिक राज्यावर आधारित आहे जिथे महिलांचा दबदबा असतो. सीरिजमध्ये कीर्ती ‘भवानी’च्या भूमिकेत असून राधिकाने ‘रुद्रा’ची भूमिका साकारली आहे. यामध्ये राधिका खलनायिकेच्या तर किर्ती नायिकेच्या भूमिकेत असून महिलांचं साम्राज्य असलेल्या परिसरातील ही एक रंजक कथा आहे.
त्यामुळे यामध्ये दोन महिलांमधील सत्ता, नियंत्रण मिळवण्यासाठीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. किर्ती सुरेश व राधिका आपटे यांची ‘अक्का’ ही सीरिज ३० ऑक्टोबरला नेटफ्लिस्कवर रिलीज होणार आहे. Radhika Apte
हेही वाचा:
Akshay Kumar: अक्षय कुमार तिसऱ्यांदा ‘या’ अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रीन





