Drishyam 3: अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ चित्रपट आता ओटीटीवर; ‘या’ दिवशी पाहता येणार
Drishyam 3: अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

Drishyam 3: अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर ‘दृश्यम: द कनक्लुजन’ (दृश्यम ३)ला देखील थिएटरमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यानंतर आता हा चित्रपट थिएटरनंतर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
दृश्यम: द कनक्लुजन म्हणजे दृश्यम ३ला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या सिनेमात अजय देवगण विजय साळगांवकरच्या भूमिकेत दिसला. अजय देवगणबरोबरच तब्बू, श्रिया सरन, जयदीप अहलावत, इशिता दत्ता, रजत कपूर, मृणाल जाधव, प्रकाश राज हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकात दिसले.
अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. २७ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर जवळजवळ दोन महिन्यानंतर आता सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
‘दृश्यम: द कन्क्लुजन’ने भारतात प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ६२ कोटींची कमाई केली होती. या सिनेमाने जगभरात ५८९.२६ कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले.
हेही वाचा :





