सासवड, (प्रतिनिधी) – दिवे (ता. पुरंदर) येथील वायु दलातील स्कॉर्डन लीडर विजयकुमार ज्ञानेश्वर झेंडे (वय 36) हे सध्या नागालँड येथे कार्यरत होते. विजयकुमार झेंडे सुट्टीवर दिवे येथे आले असताना त्यांना डेंग्यू झाल्याने त्यांना सासवड येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते
परंतु त्यांना आराम न आल्याने पुण्यातील कमांड हॉस्पिटल दक्षिण कमांड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान मंगळवारी (दि. 9) झेंडे यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिमसंस्कार करण्यात आले.
करोना काळा देशात विमानाने ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम शहिद विजयकुमार झेंडे यांनी केले तसेच भारत आणि रशिया या युद्धसरावात सहभाग घेऊन भारताचे नाव उज्ज्वल केले होते. यावेळी भारतीय वायदल व सैन्यदलातील अधिकारी, कर्मचारी पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे,
तहसिलदार विक्रम राजपूत, वडील ज्ञानेश्वर झेंडे, पत्नी वैष्णवी झेंडे, सासवड पोलीस स्टेशनचे निरीक्षक ऋषिकेश अधिकार, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, दिवे ग्रामपंचायतचे सरपंच योगेश काळे, बाळासाहेब कामथे, एड. बाजीराव झेंडे, राहुल शेवाळे, योगेश फडतरे, आशोक टिळेकर, दिनकर गायकवाड, रामदास जगताप, सुधाकर जगदाळे, मधुकर झेंडे, उपस्थित होते.