बारामती – सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, जुई नारकर, क्रीडा जागृती आयोजित आणि इंडीयन ऑईल सरहप्रायोजित ४थ्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत आज झालेल्या टाईम ट्रायल प्रकात पुण्याचा चिन्मय केवलरमानी, पुणे जिल्ह्याचाच प्रणव कांबळे, अहमदनगर जिल्ह्याची प्रणिता सोमण, क्रीडा प्रबोधिनीचा विरेंद्रसिंग पाटील, अहमदनगरची अपूर्वा गोरे, क्रीडा प्रबोधिनीचा सिद्धेश घोरपडे, मुंबईची जुई नारकर, मुंबई शहरची वेदांत पानसरे, पुणेची मानसी महाजन यांनी आपापल्या वयोगटात विजेतपद पटकावले.
बारामती येथे संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर आज इंडीव्युजल टाईम ट्रायल प्रकारतील स्पर्धा पार पाडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन बारामती तालुक्याचे प्रांताधिकारी वैभव नावाडकर, सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव प्रा. संजय साठे, स्पर्धेचे मुख्य पंच सुदाम रोकडे, स्पर्धासंचालिका दिपाली पाटील आदी मान्यवर हजर होते.