Maharashtra Monsoon : राज्यात मान्सूनचा जोर वाढणार; 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Monsoon : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला आहे.

Maharashtra Monsoon : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून आज भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रत्नागिरी, पुणे, सोलापूरसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचाही इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. (Maharashtra Monsoon)
यलो अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि काही मराठवाडा-विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये विजांसह पाऊस, जोरदार वारे आणि स्थानिक पातळीवर पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Monsoon)
मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून अधूनमधून जोरदार सरी कोसळू शकतात. सखल भागांत पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि लोकल सेवांवर किरकोळ परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Maharashtra Monsoon)
पुणे शहर आणि जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातही काही भागांत जोरदार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon)
Maharashtra Monsoon : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला! पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा






