Siya Goyal : अखेर सियाची कबुली.! म्हणाली.. कुटुंबाला अफेअरबाबत सांगण्यापेक्षा केतनला मारणं…
Siya Goyal : लोणावळ्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवीन आणि अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे.

Siya Goyal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कसून चौकशी करत असून, कटात आणखी कुणाचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, सिया गोयलने चौकशीदरम्यान केलेल्या कथित विधानामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. (Siya Goyal0
सूत्रांच्या माहितीनुसार, सियाने पोलिसांना सांगितले की, “चेतनसोबतच्या प्रेमसंबंधांची माहिती कुटुंबाला देण्यापेक्षा केतनला मारणं अधिक सोपं वाटलं. कुटुंबाला धक्का द्यायचा नव्हता, त्यामुळे हा मार्ग निवडला.” मात्र, या कथित कबुलीबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. (Siya Goyal)
सहा पथकांकडून तपास सुरू
या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी लोणावळा पोलिसांनी सहा स्वतंत्र पथके तयार केली आहेत. सियाचा भाऊ साहिल गोयलची सुमारे दहा तास चौकशी करण्यात आली असून, त्यानंतर आज सियाचे आई-वडील आणि साहिल यांची पुन्हा चौकशी सुरू आहे. या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (Siya Goyal)
क्रिकेटमधून झाली ओळख
चौकशीत साहिलने पोलिसांना सांगितले की, तो चेतन चौधरीला आधीपासून ओळखत होता. क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने चेतन आणि साहिलची मैत्री झाली होती. त्याच काळात सिया भावासोबत क्रिकेट सामने पाहण्यासाठी जात असे आणि याचदरम्यान तिची चेतनशी ओळख झाली. (Siya Goyal)
दिवाळी पार्टीनंतर वाढली जवळीक
तपासातील माहितीनुसार, गेल्या वर्षी एका कॉमन फ्रेंडच्या दिवाळी पार्टीत पुन्हा भेट झाल्यानंतर सिया आणि चेतन यांच्यातील जवळीक वाढली. जानेवारी २०२६ ते जून २०२६ या कालावधीत दोघांमध्ये २,००० हून अधिक फोन कॉल्स झाले असून, त्यांनी सुमारे २३८ तास संवाद साधल्याची माहिती कॉल डिटेल रेकॉर्डमधून समोर आली आहे. (Siya Goyal)
दोघांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून ते फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. डिलीट केलेले चॅट्स, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांचीही तपासणी सुरू आहे. (Siya Goyal)
उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
दरम्यान, केतन अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणात जलद आणि निष्पक्ष न्याय मिळावा, अशी मागणी केली. तसेच विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची विनंतीही केली होती. (Siya Goyal)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या हाय-प्रोफाइल प्रकरणाच्या न्यायालयीन लढाईत निकम यांची अधिकृत एन्ट्री झाली असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Siya Goyal)
Siya Goyal : सियाने केतनची हत्या का केली? चौकशीत हादरवणारं कारण समोर
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; सियाचा भाऊच निघाला चेतनचा…






