Maharashtra Politics : मोठी बातमी..! लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंचा पहिला उमेदवार जाहीर? ‘या’ बंडखोर खासदाराला तगडे आव्हान
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षातून सहा खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंसह पक्षाच्या नेत्यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू केला आहे.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षातून सहा खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंसह पक्षाच्या नेत्यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू केला आहे. उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम खासदार संजय दिना पाटील यांच्या ईशान्य मुंबईत जाहीर सभा घेऊन दौऱ्याला सुरुवात केली होती. (Maharashtra Politics)
त्यानंतर, आज वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात जाऊन ठाकरेंनी खासदार संजय देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी, वाशिम विधानसभा मतदारसंघातून डॉ. सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारीच जाहीर केली आहे. (Maharashtra Politics)
ठाकरे म्हणाले, मी निघालो दौऱ्याला आणि बातम्या सुरु झाल्या. काहींनी कोल्हेकुई सुरू केली. उद्धव ठाकरे फिरत नाही, शिवसेना संपली. म्हणून म्हटले आता शिवसेना दाखवतो, कडवट शिवसैनिक कुठेही गेला नाही तो तिथेच आहे. (Maharashtra Politics)
तुम्ही आमदार खासदार निवडून दिले, आता गद्दारीला थारा द्यायचा नाही, नमक हरामीला थारा द्यायचा नाही, असे म्हणत ठाकरेंनी फुटीर खासदारांवर तोफ डागली. मिंदे पासून हे सगळे नमक हराम आहेत, हे लुटारू माजले आहेत, राम मंदिर लुटायला लागले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : मोठी बातमी..! लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंचा पहिला उमेदवार जाहीर? ‘या’ बंडखोर खासदाराला तगडे आव्हान
ठाकरे पूढे म्हणाले, नमक हराम जरी गेला तरी मी हरणार नाही, थांबणार नाही, तुमच्यासारखे शिवसैनिक माझ्या सोबत आहेत. संकटच्या छातडावर बसून त्याच्यावर भगवा फडकवणारी शिवसेना आहे. तुमचा खासदार तुम्हाला जिथे दिसेल तिथे त्याला जाब विचारा. (Maharashtra Politics)
त्याची जशी भाषा तसा जाब विचारा. मुंबईचा एक खासदार पत्रकाराला बोलला म्हणून त्याला पण तसा जाब विचारा. तसेच, डॉ. सिद्धार्थ देवळे किती मत मिळाली होती? आतापासूनच तुम्ही तयारीला लागा, तीन वर्ष तुमच्या हातात आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकप्रकारे सिद्धार्थ देवळेंची उमेदवारीच जाहीर केल्याचे दिसून आले. (Maharashtra Politics)
दरम्यान, वाशिम मतदारसंघातून सिद्धार्थ देवळेंना शिवसेना महाविकास आघाडीचे तिकीट देण्यात आले. मात्र, भाजपच्या श्याम खोडे यांच्याकडून त्यांचा निसटता पराभव झाला होता. (Maharashtra Politics)





