Maharashtra Monsoon : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला! पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Monsoon : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या वेशीवर रेंगाळलेला मान्सून अखेर पूर्णपणे सक्रिय झाला आहे.

Maharashtra Monsoon : राज्यासह देशात काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सूनने सोमवारपासून पुन्हा सक्रीय झाला असून अवघ्या दोन दिवसांत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. तसेच त्याने गुजरात आणि मध्यप्रदेशच्या काही भागांपर्यंत वाटचाल केली आहे, अशी माहिती बुधवारी हवामान विभागाने दिली. दरम्यान, राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon)
आज, 24 जून रोजी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी ईशान्य अरबी समुद्राचा काही भाग, गुजरात व मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा उर्वरित भाग आणि छत्तीसगड व झारखंडच्या आणखी काही भागांमध्ये अधिक प्रगती केली आहे. (Maharashtra Monsoon)
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2-3 दिवसांत नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीस अनुकूल परिस्थिती असून, या वाऱ्यांची प्रगती उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड व बिहारच्या उर्वरित भागांमध्ये आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये होईल. त्यानंतरच्या 2-3 दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये ही प्रगती होईल. (Maharashtra Monsoon)
दरम्यान, मुंबईसह उपनगरांमध्ये बुधवारी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दादर, परळ, मलबार हिल, अंधेरी, कुर्ला, सायन आणि माटुंगा परिसरात मुसळधार पाऊल झाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. (Maharashtra Monsoon)
तसेच मागील चोवीस तासात कोकण प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागाला पावसाने झोडपले आहे. काही भागात १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली असून पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे जूनच्या पंधरवडा कोरडा गेल्यानंतर राज्यात आता चांगल्या पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon)






