Monsoon Update : राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण
Monsoon Update : महाराष्ट्रात लांबलेल्या मान्सूनने आता चांगलाच जोर पकडला असून शेतकऱ्यांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे.

Monsoon Update : राज्यातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाल्याने काही भागात पेरणीच्या कामांना वेग आल्याचे चित्र आहे. अशातच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ज्यामुळे 3 ते 7 जुलै दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे. (Monsoon Update)
या काळात सागरी किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यावर्षी एल निनोमुळे पाऊस कमी आहे. हे आधीच सांगितले आहे. मॉन्सुनचे वारे कमकुवत आहेत. (Monsoon Update)
एल निनोचा परिणाम पुढील वर्षी देखील जाणवणार असला तरी पुढील वर्षीच्या पावसाचा अंदाज आता सांगता येणार नाही, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी दिली आहे. (Monsoon Update)
Maharashtra Monsoon : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला! पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा
तसेच, रायगड जिल्ह्याला पुढील पाच दिवस पावसाचा ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. रायगडमध्ये 23 जूनला सुरू झालेल्या पावसाने दोन दिवस दडी मारली होती. मात्र, कालपासून पुन्हा पाऊस बरसू लागल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. (Monsoon Update)
पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीची कामे सुरू होण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे हयातनगर, लिंगी, पळशीसह परिसरातील शिवार जलमय झाले असून, अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. (Monsoon Update)
जोरदार पावसामुळे लहान-मोठे ओढेही दुथडी भरून वाहू लागले आहेत. पेरणीसाठी आवश्यक असलेला हा पहिला समाधानकारक पाऊस असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. (Monsoon Update)
Monsoon Care: पावसाळ्यात केस आणि त्वचा होतात चिकट? या सोप्या उपायांनी ठेवा दोन्ही निरोगी






