Rain Forecast : शेतकऱ्यांची चिंता वाढणार? 5 ते 10 सप्टेंबरनंतर देशभरात पावसाचा जोर घटण्याची शक्यता; 4 आठवड्यांचा अंदाज समोर
Rain Forecast : यंदाच्या मान्सून हंगामात देशभरात पावसाचे अत्यंत असमान वितरण (Uneven Distribution) पाहायला मिळाले आहे.

Rain Forecast : यंदाच्या मान्सूनमध्ये देशातील अनेक भागांत पावसाचे असमान वितरण पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कमी पाऊस झाला, तर काही भागांत अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. आता सप्टेंबर महिन्यातही पावसाची स्थिती शेतकऱ्यांसाठी चिंतेची ठरू शकते. (Rain Forecast)
हवामानाच्या मॉडेलवर आधारित पुढील चार आठवड्यांचा अंदाज समोर आला असून, 5 ते 10 सप्टेंबरनंतर देशातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Rain Forecast)
पुढील दोन आठवड्यांत पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाची शक्यता अधिक राहणार आहे. या भागातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसही पडू शकतो. मात्र, देशातील इतर भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात घट होण्याचे संकेत आहेत. (Rain Forecast)
विशेषतः 5 ते 10 सप्टेंबरच्या आसपास हवामानाच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये पावसामधील अंतर वाढू शकते आणि मान्सूनचा वेग काही प्रमाणात मंदावण्याची शक्यता आहे. (Rain Forecast)
मात्र, याचा अर्थ देशभरातून पाऊस पूर्णपणे माघार घेईल असा नाही. स्थानिक हवामान प्रणाली निर्माण झाल्यास काही भागांत पाऊस होऊ शकतो. त्यामुळे सध्या संपूर्ण सप्टेंबर महिना कोरडा राहणार असल्याचे निश्चितपणे सांगता येणार नाही. (Rain Forecast)
आगामी काही आठवड्यांमध्ये हवामानाच्या परिस्थितीत बदल होण्याची शक्यता असल्याने सप्टेंबरमधील पावसाचे चित्र पुढील काळात अधिक स्पष्ट होईल. दरम्यान, पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान अंदाज आणि कृषी विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Rain Forecast)
Rain Update : राज्यातील ‘या’ भागात पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज काय?






