Monsoon Update : राज्यात अतिवृष्टीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट; पुढील 5 दिवस धोक्याचे
Monsoon Update : जून महिन्यातील प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्रात मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रिय झाला आहे.

Monsoon Update : जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने राज्यातील शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र, आता मान्सूनने वेग पकडला असून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. (Monsoon Update)
भारतीय हवामान विभाग (IMD) आणि हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, 3 जुलै ते 7 जुलै या कालावधीत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Monsoon Update)
3 ते 7 जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, 3 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विशेषतः पुणे, मुंबई, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. (Monsoon Update)
डख यांच्या मते, 3 जुलैपर्यंत काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. मात्र त्यानंतर राज्यात पावसाचा जोर वाढून अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. (Monsoon Update)
विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, विदर्भात 3 जुलै ते 7 जुलैदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस या भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल, त्यानंतर पावसाचा वेग वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Monsoon Update)
जूनमध्ये मोठी पावसाची तूट
यंदा जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने राज्यातील अनेक भागांत पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. विशेषतः विदर्भात सुमारे 50 टक्के पावसाची कमतरता नोंदवली गेली आहे. ही तूट अल्पावधीत भरून निघणे कठीण असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Monsoon Update)
दरम्यान, पंजाबराव डख यांनी यंदा परतीचा मान्सूनही राज्यात जोरदार राहील असा अंदाज व्यक्त केला असून आगामी काही दिवसांत हवामानातील बदलांवर नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. (Monsoon Update)
Northeast Rain : आसाम-अरुणाचलमध्ये पावसाचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक प्रभावित






