Mahadev Jankar : येत्या काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील महत्वाच्या अशा राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत दारून पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून रणनिती आखली जात आहे. मुंबईत काँग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय युतीची घोषणा काल केली आहे. अशातच एकीकाळी भारतीय जनता पार्टीसोबत सहभागी झालेला आणि नंतर बाहेर पडलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष अर्थात रासपने महापालिका निवडणूक लढण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका एकत्र लढणार रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा मुंबई, दि. २४ डिसेंबर २०२५ राज्यातील नगरपालिका निवडणुकीनंतर होत असलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी… pic.twitter.com/99XpCGFwKm — Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 24, 2025 रासपने काँग्रेस पक्षासोबत निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका रासप काँग्रेसोबत लढणार आहे. ही घोषणा बुधवारी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महादेव जानकर यांनी केली. गेल्या काही दिवसांपूर्वीच रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर ठाकरेंनी मराठी निमित्ताने आयोजित केलेल्या जल्लोष मेळाव्यात दिसून आले होते. त्यानंतर ते आघाडीसोबत जातील असे बोलले जात होते. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि रासपचे महादेव जानकर यांनी संयुक्त पत्रकर परिषद घेत आघाडीची घोषणा केली आहे. आघाडीची घोषणा पण…. या आघाडीत रासपला किती जागा मिळणार? याबाबत स्पष्टता नसली तरी महादेव जानकर यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. काँग्रेसबरोबर रासपची आघाडी ३१ मे रोजीच झाली आहे, असे जानकर म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे कौतुक केले. राहुल गांधी हे देशातील तरुण, महिला, आदिवासी, गोरगरीब, मागासवर्गीय यांचा आवाज बनून काम करत आहेत. जागा किती मिळणार यापेक्षा आजघडीला संविधान व लोकशाही वाचवण्याची नितांत गरज आहे. यामुळे ही आघाडी स्थापन झाली असली तरी त्याचा कितीपत फायदा होतो हे पाहावे लागणार आहे. हेही वाचा : Nagma Birthday: मुस्लिम आई, हिंदू वडील… सलमान-अक्षयसोबत काम करणारी नगमा आता कुठे आहे?