ओझर – अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे पहाटे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व लक्ष्मीपूजननिमित्त महिला सरपंचांच्या हस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून मंदिर दर्शानासाठी मंदिर खुले करण्यात आले.
लक्ष्मीपूजनाचा दिवस माता लक्ष्मीचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादाने केली जाते. संस्कृती जतन करण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्तांनी मंदिरामध्ये लक्ष्मीपूजनप्रसंगी महाआरतीचा मान लक्ष्मीचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच यांना दिला.
हा मान नारायणगावचे सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, बेल्हेचे सरपंच मनीषा डावखर, पिंपळवंडीच्या सरपंच मेघा काकडे, खामगावच्या नीलम घोलप, ओतूरच्या छाया तांबे यांना मिळाला. यजमान महिलांचा सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, गणपत कवडे, मंगेश मांडे यांच्या वतीने केला. याप्रसंगी ओझरच्या पहिल्या आदर्श सरपंच अस्मिता कवडे, मयूर महाराज बोडके, जगन्नाथ कवडे, मधुकर कवडे, रोहिदास कवडे, जयश्री कुटे, छाया तांबे, भास्कर मांडे, प्रवीण कवडे, विनायक रोकडे, नामदेव टेंभेकर, जगन मांडे, ग्रामपंचायत सदस्य सुमन मांडे, ग्रामविकास उपाध्यक्ष राजेंद्र कवडे, दशरथ घोलप, रमेश घोलप, राजेश घोलप, पोलीस अधिकारी स्नेहल घोलप उपस्थित होते.