LSG vs SRH : मिचेल मार्शने मारला ५ लाखांचा षटकार! नेमकं काय आहे प्रकरण? पाहा VIDEO

Mitchell Marsh’s six hits car during LSG vs SRH in IPL 2025 : आयपीएल २०२५ चा थरार शिगेला पोहोचला आहे. हंगामातील ६१व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चुरशीची लढत झाली. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा सलामीवीर मिचेल मार्शने आपल्या संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्याने पहिल्याच चेंडूपासून विस्फोटक फलंदाजी करत षटकारांचा पाऊस पाडला. यासोबतच त्याने एका अनोख्या पद्धतीने सामाजिक योगदानही दिले. मिचेल मार्शने मारलेला एक षटकार थेट स्टेडियममधील एका कारवर जाऊन आदळला.
मिचेल मार्शने मारला पाच लाखाचा षटकार –
लखनौ सुपर जायंट्सच्या डावातील सहाव्या षटकात, मिचेल मार्शने इशान मलिंगाच्या षटकात जोरदार फलंदाजी केली. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर, मिचेल मार्शने एका लेंथ बॉलवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर एक उत्तुंग षटकार मारला. हा षटकार थेट सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या टाटा कर्व्ह कारला धडकला, ज्यामुळे कारला डेंट आला. त्यामुळे या षटकाराची किंमत ५ लाख रुपये झाली. खरं तर, हंगामाच्या सुरुवातीला, टाटा मोटर्सने घोषणा केली होती की, जर कोणत्याही फलंदाजाने सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या कारवर षटकार मारला, तर ते ग्रामीण क्रिकेटच्या विकासासाठी ५ लाख रुपयांचे क्रिकेट किट दान करतील.
Finally, someone did it. #LSGvsSRH #Mitchellmarsh pic.twitter.com/W5gDnEqNLl
— Vikas Nager (@iamvikas98) May 19, 2025
अशा परिस्थितीत, मार्शचा हा षटकार या उपक्रमाचा एक भाग बनला. टाटा मोटर्स आयपीएलचे अधिकृत प्रायोजक आहे. कंपनीने यापूर्वीही असेच उपक्रम हाती घेतले आहेत, जसे की २०२३ मध्ये कॉफी लागवडीसाठी १० लाख रुपये देणगी देणे. त्याच वेळी, २०२२ मध्ये, या ग्रुपने घोषणा केली होती की जर फलंदाजाचा षटकार टाटा पंच बोर्डवर किंवा सीमेबाहेर उभ्या असलेल्या कारवर लागला तर ५ लाख रुपये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला दान केले जातील. हे राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्याचे घर म्हणून ओळखले जाते.
हेही वाचा – Sunil Gavaskar : ‘KKR च्या जेतेपदाचा खरा हक्कदार श्रेयस होता, पण…’, गावस्करांनी गंभीरवर साधला निशाणा
मिचेल मार्शने साकारली तुफानी खेळी –
Mitchell Marsh’s six didn’t just clear the boundary — it hit someone’s ride! 😅
No Damage happened!😉
📸: JioHotstar#MitchellMarsh #LSGvSRH #LSGvsSRH #IPL2025 #TATAIPL #BigHit #CarTrouble #CricketFreak pic.twitter.com/xGA6WsEIF4
— SportsTiger (@The_SportsTiger) May 19, 2025
या सामन्यात मिचेल मार्शने लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरुवात दिली. त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. यानंतर, त्याने चौकार मारला. मिचेल मार्शने एकूण ३९ चेंडूंचा सामना केला आणि १६६.६६ च्या सरासरीने ६५ धावा केल्या. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.





