LPG Cylinder Price : सकाळ सकाळी महागाईचा मोठा झटका.! महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर
जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी (दि. १) सर्वसामान्यांसह व्यावसायिक क्षेत्राला महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे.

LPG Cylinder Price : जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी (दि. १) सर्वसामान्यांसह व्यावसायिक क्षेत्राला महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग व्यवसाय आणि लघुउद्योगांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, घरगुती ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
१९ किलोचा कमर्शिअल सिलिंडर पुन्हा महाग :
दि. १ जूनपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ४२ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये कमर्शिअल सिलिंडरच्या किमती आणखी वाढल्या आहेत.
प्रमुख शहरांतील नवीन कमर्शिअल सिलिंडर दर :
मुंबई – ₹3,067.50
दिल्ली – ₹3,113.50
अहमदाबाद – ₹3,135
बेंगळुरू – ₹3,198
चेन्नई – ₹3,283
लखनौ – ₹3,236
जयपूर – ₹3,155
आखाती देशांमधील तणाव आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारातील अस्थिरतेचा परिणाम एलपीजीच्या किमतींवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या काही काळात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम व्यवसायांच्या खर्चावर होत आहे.
काही शहरांतील घरगुती सिलिंडरचे दर :
दिल्ली – ₹913
अहमदाबाद – ₹920
जयपूर – ₹916.50
सरकारने सध्या घरगुती ग्राहकांवरील अतिरिक्त आर्थिक भार टाळण्यासाठी दरात कोणताही बदल केलेला नाही.
छोट्या सिलिंडरच्या किमतीत बदल :
घरगुती वापरासाठी उपलब्ध असलेल्या काही छोट्या सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.
५ किलो घरगुती सिलिंडर – ₹339
१० किलो एक्स्ट्रालाइट सिलिंडर – ₹652
५ किलो नॉन-डोमेस्टिक (कमर्शिअल) रीफिल – ₹821.50
तसेच नवीन ५ किलो व्यावसायिक सिलिंडरसाठी ग्राहकांना सुमारे ₹1,765.50 ते ₹1,779.50 पर्यंत खर्च करावा लागणार आहे.
उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या सिलिंडरच्या दरातही वाढ :
मोठ्या उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्च क्षमतेच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे.
४७.५ किलो सामान्य सिलिंडर – ₹7,779.50
४७.५ किलो इंडेन एक्स्ट्रातेज सिलिंडर – ₹7,836
४२५ किलो क्षमतेचा मोठा सिलिंडर – ₹69,651
या वाढीमुळे उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम वस्तू आणि सेवांच्या किमतींवरही दिसून येऊ शकतो. व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीचा सर्वाधिक फटका हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, बेकरी, कॅटरिंग सेवा आणि लघुउद्योगांना बसण्याची शक्यता आहे.
महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीमुळे व्यावसायिक क्षेत्रावरील आर्थिक ताण वाढला आहे. मात्र घरगुती सिलिंडरचे दर स्थिर ठेवल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.







