Sanjay Raut – सध्या घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सरकारकडून गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी, बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याने नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. यावरून ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देशात भयंकर चित्र असल्याचे म्हणत, सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राऊत म्हणाले, देशाला अत्यंत गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही, सर्व काही अलबेल आहे, इंधनाची टंचाई होणार नाही, सिलेंडरचे भाव वाढणार नाहीत, अशा अफवा सरकारकडून अधिकृतरित्या पसरवल्या जात आहे, पण पंतप्रधान मोदी हे पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू अशा राज्यात प्रचारात अडकले आहेत. Indapur News त्यांच्या प्रचाराच्या भाषणात सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख नाही. देशात सध्या सिलेंडरसाठी रांगा लागल्या आहेत आणि 25 दिवस सिलेंडर मिळणार नाही असे चित्र आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री एक शब्द बोलत नाही. नोटबंदीच्या वेळी जशा रांगा लावून माणसे मारली गेली. तेच आता सिलेंडरच्या रांगेत होईल, असे भयंकर चित्र देशात दिसत आहे. कारण हे सरकार जनता विरोधी आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात अपयशी ठरल्याने ही परिस्थिती आपल्यावर आली आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.