Gas Cylinders : गॅस सिलिंडरसाठी नागरीक हैराण.! मुंबईत ३० टक्के हॉटेल, उपाहारगृहे बंद
गॅसचा साठा कमी असल्याने स्वयंपाकघरातील कामकाजही मर्यादित करण्यात आले आहे. गॅसची (Gas Cylinders) उपलब्धता कमी होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

Gas Cylinders : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याचा फटका मुंबईतील हॉटेल आणि उपहारगृहांना बसला आहे. शहरातील जवळपास ३० टक्के हॉटेल आणि उपाहारगृहे बंद ठेवण्यात आली असून, काही ठिकाणी मर्यादित वेळ आणि कमी मेन्यूसह सेवा चालवली जात आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने व्यावसायिक एलपीजीच्या सरासरी मासिक गरजेपैकी सुमारे २० टक्के गॅस उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र हा गॅस प्रत्यक्षात बाजारात कधी उपलब्ध होणार याकडे व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.Gas Cylinders
हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनांनी तात्पुरत्या उपाययोजना सुचवत, उपलब्ध गॅस काटकसरीने वापरणे, जास्त गॅस लागणारे पदार्थ मेन्यूमधून कमी करणे, शक्य असल्यास इंडक्शन कुकर किंवा विजेवर चालणारी उपकरणे वापरणे आणि गर्दीच्या वेळांवर लक्ष केंद्रित करून कामकाजाची वेळ ठरवणे, अशा सूचना दिल्या आहेत. Gas Cylinders
तसेच घाबरून मोठ्या प्रमाणात सिलिंडर साठवू नये. अशा प्रकारची साठेबाजी केल्यास बाजारातील परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशाराही दिला आहे. नवीन सिलिंडरचा पुरवठा लवकर झाला नाही, तर येत्या काही दिवसांत आणखी हॉटेल आणि खानावळी बंद करण्याची वेळ येऊ शकते असे चित्र निर्माण झाले आहे.Gas Cylinders
दरम्यान, गॅसचा साठा कमी असल्याने स्वयंपाकघरातील कामकाजही मर्यादित करण्यात आले आहे. गॅसची उपलब्धता कमी होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अनेक ठिकाणी यामध्ये काळाबाजार सुरू झाला आहे. सिलिंडरच्या मूळ किंमतीपेक्षा दुप्पट पैसे दिले तर सिलिंडरची उपलब्ध करून देत असल्याची माहीती आहे.






