Wagholi News : पिंपरी सांडस परिसरात देशी बनावटीचे पिस्टल जप्त; दोघांवर लोणीकंद पोलिसांची कारवाई
Wagholi News : बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर/पिस्टल बाळगून रात्रीच्या वेळी वाडेबोल्हाई परिसरातील मोकळ्या जागेत फायरिंगचा सराव करणाऱ्या दोघांवर लोणीकंद पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.

Wagholi News : बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे पिस्टल बाळगून वाडेबोल्हाई येथे फायरिंगचा सराव केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पिंपरी सांडस येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान एक पिस्टल आणि एक राऊंड जप्त केला आहे. (Wagholi News)
याप्रकरणी पोलिस शिपाई सुधीर शिवले यांनी फिर्याद दिली असून ऋषीकेश वामन भोरडे (वय २७, रा. पिंपरी सांडस) आणि प्रणव संदीप भोरडे (वय १९, रा. पिंपरी सांडस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Wagholi News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिस ठाण्याच्या तपास पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत ऋषीकेश भोरडे याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. (Wagholi News)
या पिस्टलच्या सहाय्याने त्याने मित्राच्या मदतीने वाडेबोल्हाई परिसरात रात्रीच्या वेळी फायरिंगचा सराव केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. संशयित ऋषीकेश भोरडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. (Wagholi News)
त्याच्या घराची झडती घेतली असता देशी बनावटीचे एक पिस्टल आणि त्यामध्ये एक राऊंड आढळून आले. सदर पिस्टल व राऊंड जप्त करण्यात आले आहे. त्याने प्रणव भोरडे याच्यासोबत वाडेबोल्हाई येथे सराव केल्याचे सांगितले. संबंधितांनी पिस्टल बाळगून फायरिंगचा सराव केल्याने दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (Wagholi News)





