Lok Sabha Election 2024 NCP Second List : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी जाहीर करण्यात आली आहे. या दुसऱ्या यादीत दोन जागांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वाधिक चर्चेत असलेली जागा बीड आणि भिवंडीतून उमेदावर जाहीर करण्यात आले आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) तर भिवंड लोकसभा मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Suresh Mhatre) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पहिल्या यादीत 5 जणांची नावे –
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पहिल्या यादीत वर्धामधून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीमधून भास्कर भगरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
विजयाचा निर्धार पक्का करून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या साथीने ‘तुतारी’ला ललकारी देऊया, आणि दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडवूया.… pic.twitter.com/yMi96DJqSp
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 4, 2024
दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडवूया –
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारांची यादी X या हॅंडलवर जाहीर केली आहे. यादी जाहीर करताना सोबत लिहिले आहे की, “विजयाचा निर्धार पक्का करून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या साथीने ‘तुतारी’ला ललकारी देऊया, आणि दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडवूया.”