‘बीडमध्ये ईव्हीएम मशीनवर तुतारीधारी माणूस चिन्ह अंधूक’ मविआ उमेदवाराचा आरोप

Lok Sabha Election 2024 । राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदानाची सकाळीच सुरुवात झाली. या टप्प्यात राज्यतील 11 लोकसभा मतदारसंघांमधील दिग्गज उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. आज सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे.त्यामध्ये पुन्हा एकदा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान झाले आहे.
राज्यातील पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,जालना, नंदुरबार, रावेर, अहमदनगर, शिर्डी या मतदारसंघात मतदान होत आहे.दरम्यान,राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत एकूण 17.51 टक्के मतदान झाले. त्यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान म्हणजे २२.१२ टक्के मतदान झाले आहे. त्यानंतर जालन्यात २१.३५ टक्के मतदान झाले आहे.
अशात केज, बीडमध्ये मशीन बंद पडल्याच्या तक्रारी आल्याची माहिती समोर येत आहे. बीडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे गंभीर आरोप केले आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’ईव्हीएम मशीनवर माझे चिन्ह अंधूक आहे. तुतारीधारी माणूस असलेले चिन्ह अंधूक असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.’
हे वाचलं का
जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरूवात
महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी बजावला मतदानाचा अधिकार
भाजप उमेदवार माधवी लता यांनी हैदराबादमध्ये केले ‘मतदान’
10 राज्यातील 96 जागांसाठी आज मतदान ; अखिलेश,ओवेसीसह 1717 उमेदवार रिंगणात
अभिनेता ज्युनियर एनटीआरने बजावला मतदानाचा हक्क
निलेश लंकेंनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती”
चौथ्या टप्प्याचे मदतदन सुरु ; पंतप्रधान मोदी म्हणाले,”….लोकशाही बळकट करूया!…”





