माद्रिद – जमिनीखाली असलेल्या एका अंधाऱ्या गुहेत तब्बल 500 दिवस एकाकी वास्तव्य करण्याचा विक्रम एका महिलेने केला आहे. बीटरीस फ्लेमिनी असे या महिलेचे नाव असून 14 नोव्हेंबर 2021 रोजी ती जमिनीखालील 230 फूट खोल अशा अंधाऱ्या गुहेत वास्तव्यासाठी गेली होती. त्यानंतर 14 एप्रिल रोजी ती गुहेतून बाहेर आली मधल्या कालावधीमध्ये तांत्रिक कारणामुळे तिला आठ दिवसांसाठी गुहेच्या बाहेर यावे लागले होते.
अन्यथा तिचे गुहेतील वास्तव्य तब्बल 509 दिवसांचे झाले असते गिनीज बुक किंवा इतर विक्रम पुस्तकांनी अद्याप या विक्रमाची दखल घेतली नाही पण त्यांनी या विक्रमाबाबत चौकशी सुरू केली आहे तांत्रिक कारणामुळे बीटरीस आठ दिवसांसाठी गुहेच्या बाहेर आल्यामुळे तिच्या नावावर विक्रम नोंद होण्याची शक्यता कमी व्यक्त होत आहे. बिटरीस एक व्यावसायिक गिर्यारोहक असून नवनवीन उपक्रम राबवून साहसी कामे करणे तिला आवडते त्याच हेतूने तिने अंधाऱ्या गुहेत एकाकीपणे राहण्याचा निर्णय घेतला होता.
तिने गुहेतील तिच्या या वास्तव्याची व्हिडिओग्राफी केली असून दररोजचे रेकॉर्डिंग ती गुहेच्या बाहेर ठेवून देत असे तिच्या मित्रांकडून ते पुढिल कार्यवाहीसाठी तज्ज्ञांकडे पाठवले जात असे तीनशे दिवस अत्यंत एकाकी अवस्थेत 230 फूट खोल खाली अंधाऱ्या गुहेत राहिल्यानंतर काही तांत्रिक मुद्द्यामुळे आठ दिवसांसाठी तिला गुहेबाहेर यावे लागले होते. या 8 दिवसांच्या कालावधीमध्ये तिने या गुहेच्या बाहेरच एका तंबूमध्ये वास्तव केले होते जगापासून संपूर्ण बाजूला जाऊन एकाकी अवस्थेत अंधाऱ्या गुहेत अशाप्रकारे राहणे हा अतिशय वेगळा अनुभव होता असे गुहेतून बाहेर आल्यावर तिने म्हटले आहे.
यापूर्वी 1987 मध्ये एका इटालियन व्यक्तीने अशा प्रकारे अंधाऱ्या गुहेमध्ये 210 दिवस व्यतीत केले होते तर 2016 मध्ये एका सरबीयन नागरिकाने गुहेत 460 दिवस वास्तव्य केले होते त्यामुळे बिटरीस ने घेतलेला आठ दिवसांचा ब्रेक जरी सोडला तरी सुद्धा तिने 500 दिवस अंधाऱ्या गुहेत वास्तव्य केले असल्यामुळे तिच्या नावावर विक्रमाची नोंद होईल का याबाबत आता चाचणी सुरू झाली आहे. तिला पाचशे दिवसांच्या कालावधीमध्ये जगात कोणत्या घडामोडी घडल्या याची कोणतीही कल्पना बीट्रीसला नाही त्यामुळे आता गुहेतून बाहेर आल्यावर ती या सर्व घडामोडी जाणून घेण्यात उत्सुक आहे.