पाटणा : बिहारमधील NDA सरकारच्या शपथविधीनंतर, कोणत्या पक्षाला त्यांच्या जागांच्या तुलनेत सर्वाधिक मंत्रिपदं मिळाली, हे स्पष्ट झालं आहे. एकूण २०२ जागांसह सत्तेत परतलेल्या एनडीए युतीत भाजप आणि जेडीयू हे मोठे पक्ष असले तरी, मंत्रिपदांच्या वाटपात दोघांमध्ये एक रंजक समतोल दिसून येत आहे. नितीश कुमार यांनी १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मंत्रिपदांमध्ये भाजप पुढे, पण ‘या’ छोट्या पक्षांना मिळाला मोठा फायदा – नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदांच्या संख्येनुसार भाजप आघाडीवर दिसत असला तरी, मिळालेल्या जागांच्या प्रमाणात पाहिल्यास, HAM (हिंदुस्तानी अवाम मोर्चा) आणि RLM (राष्ट्रीय लोक मोर्चा) यांसारख्या लहान पक्षांना सर्वात जास्त फायदा झाला आहे. कोणत्या पक्षाकडे किती जागा? नवीन विधानसभेत एनडीएकडे एकूण २०२ जागा आहेत: भाजप: ८९ जागा (सर्वात मोठा पक्ष) जेडीयू: ८५ जागा एलजेपी (रामविलास): १९ जागा हम (HAM): ५ जागा आरएलएम (RLM): ४ जागा पक्ष जागा संख्या एकूण मंत्रिपदे भाजप ८९ १४ (दोन उपमुख्यमंत्री धरून) जेडीयू ८५ ९ (मुख्यमंत्री धरून) एलजेपी (रामविलास) १९ २ हम (HAM) ५ १ आरएलएम (RLM) ४ १ भाजप: संख्यात्मक वर्चस्व भाजपला दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण १४ मंत्रिपदे मिळाली आहेत, जी संख्या जेडीयूपेक्षा जास्त आहे. उपमुख्यमंत्री: सम्राट चौधरी, विजय सिन्हा इतर मंत्री: मंगल पांडे, दिलीप जयस्वाल, नितीन नवीन, रामकृपाल यादव, संजय सिंह टायगर, अरुण शंकर प्रसाद, सुरेंद्र मेहता, नारायण प्रसाद, रमा निषाद, लखेंद्र रौशन, श्रेयसी सिंह आणि प्रमोद कुमार. जेडीयू: संतुलित प्रतिनिधित्व – मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह जेडीयूला एकूण ९ मंत्रिपदे मिळाली आहेत. मुख्यमंत्री: नितीश कुमार इतर मंत्री: विजय कुमार चौधरी, विजेंद्र यादव, श्रवण कुमार, लेशी सिंह, अशोक चौधरी, मदन सहनी, सुनील कुमार आणि मोहम्मद जमा खान. छोट्या पक्षांचे ‘अच्छे दिन’ एलजेपी (रामविलास): फक्त १९ जागा असतानाही पक्षाला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत, जो त्यांच्या आकाराच्या तुलनेत एक मोठा राजकीय फायदा मानला जात आहे. हम (HAM): ५ जागा असूनही एक मंत्रिपद मिळाले. प्रति मंत्रिपद ५ जागांचा हा अनुपात या छोट्या पक्षासाठी खूप महत्त्वाचा आहे. आरएलएम (RLM): केवळ ४ जागा असलेल्या आरएलएमलाही एक मंत्रिपद मिळालं आहे. हा सर्वात मोठा फायदेशीर करार ठरला आहे. शपथविधी सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती – या शपथग्रहण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यात आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू नायडू, दिल्लीच्या रेखा गुप्ता, हरियाणाचे नायब सिंह सैनी, आसामचे हिमंता बिस्वा सरमा आणि नागालँडचे नेफ्यू रियो यांचा समावेश होता.