Supriya Sule : सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? शिंदेसेनेच्या खासदाराच्या विधानाने चर्चांना उधाण; पडद्यामागे काय घडतंय?
Supriya Sule : लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेच्या विधेयकावरून राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेच्या विधेयकाला अटी-शर्तींसह पाठिंबा देण्याबाबत शरद पवार यांच्या पक्षाकडून संकेत दिले जात असल्याच्या चर्चांदरम्यान, शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. (Supriya Sule)
लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेच्या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि द्रमुक यांसारखे विरोधी पक्ष अटी-शर्तींसह पाठिंबा देऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांनीही विधेयकाबाबत अटी-शर्तींचा उल्लेख करत पाठिंब्याचा विचार केला जाऊ शकतो, असे संकेत दिल्याचे सांगितले जात आहे. (Supriya Sule)
‘सुप्रियाताईंना मंत्रिपद मिळालं तर आनंदच होईल’
या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना विचारले असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. (Supriya Sule)
“कोण काय म्हणतंय, हे मला माहिती नाही. सुप्रियाताई आताच आल्या होत्या. त्या आमच्या ताई आहेत. त्यांना मंत्रिपद मिळालं, तर नक्कीच मला आनंद होईल,” असे म्हस्के म्हणाले. (Supriya Sule)
म्हस्के यांच्या या विधानामुळे सुप्रिया सुळे यांच्या संभाव्य केंद्रीय मंत्रिपदाबाबतच्या चर्चांना अधिकच रंग चढला आहे. मात्र, त्यांच्या विधानातून मंत्रिपदाबाबत कोणताही अधिकृत निर्णय झाल्याचे स्पष्ट होत नाही. (Supriya Sule)
संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप विविध राजकीय डावपेच आखत असल्याचा दावा त्यांनी केला. (Supriya Sule)
संपूर्ण पक्ष फोडता आला नाही, तर त्या पक्षांतील वैयक्तिक खासदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न केले जातील, असा आरोप राऊत यांनी केला. एका खासदाराची किंमत १५० कोटी रुपये असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच खासदारांना पैसे पोहोचवण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्यावर सोपवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Supriya Sule)
‘विधेयक मंजूर होणारच’; म्हस्केंचा दावा
संजय राऊत यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना नरेश म्हस्के यांनी लोकसभा मतदारसंघ फेररचना विधेयक मंजूर होणार असल्याचा दावा केला. विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करत असून, विरोधी पक्षांतील खासदारही या विधेयकाला पाठिंबा देतील, अशी भूमिका त्यांनी मांडली. (Supriya Sule)
विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांवर टीका करण्यासाठी आणि त्यांच्यावर आरोप करण्यासाठी राऊत अशी विधाने करत असल्याचा आरोपही म्हस्के यांनी केला. (Supriya Sule)
हिवाळी अधिवेशनाबाबतही चर्चा
दरम्यान, या विधेयकावरून काँग्रेसनेही सावध भूमिका घेतली आहे. खासदारांना दिल्लीतील घडामोडींवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे. हिवाळी अधिवेशन होण्याऐवजी थेट अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जाऊ शकते, असा दावाही राजकीय वर्तुळात केला जात आहे. हिवाळी अधिवेशन आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. (Supriya Sule)
एकीकडे लोकसभा मतदारसंघ फेररचना विधेयकावरून राजकीय संघर्ष सुरू असताना, दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या संभाव्य केंद्रीय मंत्रिपदाची चर्चा रंगली आहे. मात्र, या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे आगामी संसदीय घडामोडींमध्ये नेमके कोणते राजकीय समीकरण समोर येते, याकडे लक्ष लागले आहे. (Supriya Sule)
Supriya Sule : राष्ट्रवादीतून कोणताही प्रस्ताव आलेला नाही; सुप्रिया सुळेंनी केले स्पष्ट




