Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

MI vs DC Kuldeep Yadav achieves 100 IPL wickets : कुलदीप यादवची गणना भारताच्या सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याने आयपीएलमध्ये एक मोठी कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात रायन रिकेलटनला बाद करून कुलदीपने ही कामगिरी केली. खरंतर, कुलदीपने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. ९७ आयपीएल सामने खेळल्यानंतर या चायनामन फिरकी गोलंदाजाने १०० विकेट्सचा टप्पा गाठला. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद १०० विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे.
कुलदीप यादवच्या आयपीएलमध्ये १०० विकेट्स पूर्ण –
आयपीएलमध्ये भारतीय फिरकी गोलंदाजातर्फे सर्वात जलद १०० विकेट्स घेण्याचा विक्रम अमित मिश्राच्या नावावर आहे. त्याने ८३ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. वरुण चक्रवर्तीनेही फक्त ८३ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चहलने ८४ सामन्यांमध्ये १०० आयपीएल विकेट्स पूर्ण केल्या होत्या. तर कुलदीपने ९७ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. हरभजन सिंगचे नाव आत पाचव्या क्रमांकावर घसरले आहे. त्याने १०० सामन्यात १०० विकेट्स घेतल्या.
KD’s 100th IPL wicket, thanks to Madhav’s first IPL catch 🫶 pic.twitter.com/rr5xqpmIi0
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 21, 2025
आयपीएलमध्ये सर्वात जलद १०० विकेट्स घेणार भारतीय फिरकी गोलंदाज (सामन्यानुसार) :
- ८३-अमित मिश्रा
- ८३-वरुण चक्रवर्ती
- ८४-युझवेंद्र चहल
- ९७-कुलदीप यादव
- १०० – हरभजन सिंग
हेही वाचा – MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज
आयपीएल २०२५ मधील कुलदीप यादवची कामगिरी –
आयपीएलच्या चालू हंगामात कुलदीपच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत आणि या काळात त्याने फक्त १३ विकेट्स घेतल्या आहेत. आतापर्यंत कुलदीप ज्या पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो त्या पद्धतीने गोलंदाजी करू शकलेला नाही.





