\n

तत्पूर्वी, आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ कोलकाता नाईट रायडर्ससमोर केवळ 113 धावांवर आटोपला. कोलकाताच्या गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीसमोर हैदराबादचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. आयपीएलच्या इतिहासातील अंतिम फेरीतील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2013 मध्ये मुंबईने चेन्नईला 149 धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात चेन्नईला केवळ 125 धावा करता आल्या होत्या.

\n

कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 3 बळी घेतले. केकेआरच्या विकेट्स मिळविण्याची सुरुवात मिचेल स्टार्कने केली, ज्याने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माला क्लीनबोल्ड केले. हैदराबादसाठी फलंदाजीत एकमेव कर्णधार पॅट कमिन्सने सर्वात मोठी खेळी खेळली आणि 19 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 24 धावा केल्या.

\n
\n

Innings Break!

\n

A relentless bowling effort in the #Final from Kolkata Knight Riders 👏👏

\n

A 🎯 of 1️⃣1️⃣4️⃣ to achieve glory🏆

\n

Can #SRH turn things around things around with the ball? 🤔

\n

Scorecard ▶️ https://t.co/lCK6AJCdH9#TATAIPL | #KKRvSRH | #TheFinalCall pic.twitter.com/DLqIvWQoKf

\n

— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024

\n

\n

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्या बाजूने अजिबात गेला नाही. हैदराबादचा संघ 18.3 षटकात 113 धावांवर ऑलआऊट झाला. पहिल्याच षटकात एक विकेट गमावल्याने हैदराबादची सुरुवात खराब झाली. यानंतर संघ सावरू शकला नाही आणि हळूहळू विकेट गमावत राहिला. संघासाठी एकही फलंदाज मोठी आणि संतुलित खेळी खेळू शकला नाही. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांसारखे अनेक महान फलंदाज संघात होते, परंतु ते सर्व केकेआरच्या गोलंदाजांसमोर अपयशी ठरले.

\n

असा होता हैदराबादचा डाव…

\n

संघाची सुरुवात धक्क्याने झाली. अभिषेक शर्मा दोन धावा आणि ट्रॅव्हिस हेड खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांसमोर हैदराबादची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. मिचेल स्टार्कने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अभिषेक शर्माला जबरदस्त आऊट स्विंग व्दारे क्लीनबोल्ड करत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गोल्डन डकचा बळी ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने संघाला दुसरा धक्का बसला. त्याला वैभव अरोरा माघारी धाडलं.

\n

Ostrava Golden Spike 2024 : गोल्डनबाॅय ‘नीरज चोप्रा’ची ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेतून माघार; समोर आलं ‘हे’ कारण…

\n

\n

हैदराबादने 62 धावांवर 5 पहिले प्रमुख फलंदाज गमावले होते. राहुल त्रिपाठी 09, एडन मार्करम 20, नितीशकुमार रेड्डी 13, हेनरिक क्लासेन 16, शाहबाज अहमद 08, अब्दुल समद 04, पॅट कमिन्स 24 तर जयदेव उंडकट 04 धावा करून माघारी परतले. तर भुवनेश्वर कुमार खाते न उघडता नाबाद राहिला. कमिन्सने सर्वाधिक 24 धावा केल्या आणि तो संघाचा शेवटचा बळी ठरला.

\n

केकेआरच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी…

\n

केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 3 बळी घेतले. यादरम्यान त्याने 2.3 षटकात 19 धावा दिल्या. याशिवाय मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. बाकी वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा आणि सुनील नरेन यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.

\n

Asian Senior Championships 2024 : भारतीय जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकरचे ऐतिहासिक सुवर्णपदक….

\n

\n

दहा वर्षांनी केकेआरने पटकावले विजेतेपद 

\n

कोलकाता नाईट रायडर्स याआधी 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल चॅम्पियन बनले होते. केकेआरने 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून आणि 2014 मध्ये पंजाब किंग्जचा 3 गडी राखून पराभव करून आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. 2014 नंतर, कोलकाता 2021 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला, परंतु विजेतेपदाच्या लढतीत सीएसके कडून 27 धावांनी पराभूत झाला. आता अखेर 2014 च्या म्हणजेच 10 वर्षांनंतर तिसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीग ट्रॉफी जिंकण्यात यश आले आहे. यासह कोलकाताने आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"IPL 2024 (KKR vs SRH, Final) : कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा चॅम्पियन..! हैदराबादचा पराभव करत पटकावलं आयपीएल 2024चे विजेतेपद…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/05/kkr-ipl-won.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/kolkata-won-the-ipl-2024-title-crushed-hyderabad-badly-in-the-final-champion-for-the-third-time#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/05/kkr-ipl-won.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/kolkata-won-the-ipl-2024-title-crushed-hyderabad-badly-in-the-final-champion-for-the-third-time#webpage","name":"IPL 2024 (KKR vs SRH, Final) : कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा चॅम्पियन..! हैदराबादचा पराभव करत पटकावलं आयपीएल 2024चे विजेतेपद…","url":"https://www.dainikprabhat.com/kolkata-won-the-ipl-2024-title-crushed-hyderabad-badly-in-the-final-champion-for-the-third-time","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/kolkata-won-the-ipl-2024-title-crushed-hyderabad-badly-in-the-final-champion-for-the-third-time#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/05/kkr-ipl-won.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/kolkata-won-the-ipl-2024-title-crushed-hyderabad-badly-in-the-final-champion-for-the-third-time#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/kolkata-won-the-ipl-2024-title-crushed-hyderabad-badly-in-the-final-champion-for-the-third-time","name":"IPL 2024 (KKR vs SRH, Final) : कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा चॅम्पियन..! हैदराबादचा पराभव करत पटकावलं आयपीएल 2024चे विजेतेपद…"}}]}}}

IPL 2024 (KKR vs SRH, Final) : कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा चॅम्पियन..! हैदराबादचा पराभव करत पटकावलं आयपीएल 2024चे विजेतेपद…