Manish Pandey Record : मनीष पांडेची ऐतिहासिक कामगिरी! विराट-रोहितनंतर आयपीएलमध्ये ‘हा’ कारनामा करणारा तिसराच खेळाडू
Manish Pandey Record : ३६ वर्षीय मनीष पांडे आता अशा मोजक्या खेळाडूंच्या विशेष यादीत सामील झाला आहे, ज्यामध्ये फक्त विराट आणि रोहित सामील आहेत.

Manish Pandey 19th IPL season record : केकेआरचा अनुभवी फलंदाज मनीष पांडे याने रविवारी सनराइजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे. ३६ वर्षीय मनीष पांडे आता अशा मोजक्या खेळाडूंच्या विशेष यादीत सामील झाला आहे, ज्यांनी आयपीएलच्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या सर्व १९ मोसमांत किमान एक सामना खेळला आहे. यापूर्वी केवळ विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोनच खेळाडूंना हा मान मिळाला होता.
विराट-रोहितनंतर तिसराच खेळाडू –
खराब फॉर्ममुळे त्रस्त असलेल्या रमनदीप सिंहच्या जागी मनीष पांडेला संघात संधी देण्यात आली. चालू मोसमाच्या सुरुवातीला झालेल्या लिलावात केकेआरने त्याला ७५ लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. मात्र, सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला बेंचवर बसावे लागले होते. अशा स्थितीत कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी युवा खेळाडूंपेक्षा मनीष पांडेच्या अनुभवावर अधिक विश्वास दाखवला. विशेष म्हणजे, मागील आयपीएल हंगामानंतर मनीष पांडेने कोणताही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही. अगदी कर्नाटकच्या देशांतर्गत संघातही त्याला स्थान मिळाले नव्हते. असे असतानाही, त्याच्या उत्कृष्ट फिटनेस आणि जुन्या अनुभवाच्या जोरावर त्याने थेट आयपीएलच्या मैदानात दमदार पुनरागमन केले आहे.
Manish Pandey becomes third player after Virat Kohli and Rohit Sharma to feature in all 1️⃣9️⃣ IPL seasons 🤩⚡🏏#IPL #ViratKohli #RohitSharma #ManishPandey #CricketTwitter pic.twitter.com/ttCvlPYmab
— InsideSport (@InsideSportIND) May 3, 2026
कारकीर्द आणि महत्त्वाचे टप्पे –
मनीष पांडेचा आयपीएलमधील प्रवास अतिशय चढ-उतारांचा राहिला आहे. २००८ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या पांडेने २००९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून खेळताना आयपीएलच्या इतिहासात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर त्यांनी पुणे वॉरियर्स इंडिया आणि केकेआर या संघांचे प्रतिनिधित्व केले. २०१४ मध्ये गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली केकेआरने दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले, तेव्हा मनीष पांडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याच मोसमात त्यांनी पहिल्यांदा एका मोसमात ४०० धावांचा टप्पा ओलांडला होता.
हेही वाचा – Sunil Narine Record : सुनील नरेनने रचला नवा इतिहास! आयपीएलमध्ये ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच परदेशी खेळाडू
धोनीच्या विक्रमाची प्रतीक्षा –
A batting collapse by SRH.
When last match of Manish Pandey SRH scored 276 and today they restrict them in 165.
A easy chase for KKR. pic.twitter.com/oefRSuEOKE— KRIK-MATE👑 (@krik90mate) May 3, 2026
या यादीत ४४ वर्षीय माजी कर्णधार एमएस धोनीचाही समावेश होऊ शकला असता, परंतु दुखापतीमुळे तो सध्या स्पर्धेबाहेर आहेत. अशा स्थितीत मनीष पांडेने विराट-रोहित यांच्या यादीत बसून भारतीय क्रिकेटमधील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. पांडेच्या या कमबॅकमुळे केकेआरच्या फलंदाजीची फळी अधिक मजबूत झाली असून, चाहत्यांनाही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.





