Sunil Narine Record : सुनील नरेनने रचला नवा इतिहास! आयपीएलमध्ये ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच परदेशी खेळाडू
Sunil Narine Record : सुनील नरेनने केकेआरकडून खेळताना सनरायझर्सविरुद्ध असा पराक्रम केला आहे, जो आयपीएल इतिहासात कोणत्याही परदेशी खेळाडूला करता आला नव्हता.

Sunil Narine’s record of taking 200 wickets in IPL : क्रिकेट जगतात वय हा फक्त एक आकडा असतो हे सुनील नरेनने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ३७ वर्षांचा असूनही, कोलकाता नाइट रायडर्सचा हा अनुभवी फिरकीपटू अजूनही मैदानावर आपली जादू दाखवत आहे. आयपीएल २०२६ च्या ४५ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नरेनने दोन विकेट्स घेत विक्रमांची रांग लावली आणि आपण आयपीएलमधील सर्वात हुशार गोलंदाजांपैकी एक का आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिले.
२०० विकेट्स घेणारा पहिलाच परदेशी गोलंदाज –
हैदराबादला सहावा धक्का देताना नरेनने आयपीएल मध्ये २०० विकेट्सचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. यासह, तो आयपीएलच्या इतिहासात २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज बनला आहे. राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर सलिल अरोराची विकेट्स घेत त्याने हा ऐतिहासिक पराक्रम आपल्या नावावर केला.एकूणच, नरेन हा आयपीएल मध्ये २०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
200 wickets and counting! 🎯🔥
Sunil Narine becomes the first-ever bowler to pick 200 wickets for a single franchise in IPL history with Kolkata Knight Riders 💜
A true KKR legend rewriting the record books 👑#IPL2026 #KKR #SKC pic.twitter.com/gulWJCNlgk
— Sportskeeda (@Sportskeeda) May 3, 2026
तिसराच गोलंदाज ठरला –
यापूर्वी युझवेंद्र चहल (२२८) आणि भुवनेश्वर कुमार (२१५) यांनी ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे, २०१२ पासून केवळ कोलकाता नाइट रायडर्ससाठी खेळताना नरेनने हा पराक्रम केला आहे. एकाच संघासाठी २०० विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज बनला असून, त्याची इकॉनॉमी रेट (सुमारे ६.८) १०० पेक्षा जास्त विकेट्स घेतलेल्या गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम आहे.
दुहेरी विक्रम करणारा पहिलाच खेळाडू –
Major feat unlocked! 🔓🫡
Sunil Narine becomes just the 3⃣rd player to bag 2⃣0⃣0⃣ #TATAIPL wickets 👏
Updates ▶️ https://t.co/muersQO7at#KhelBindaas | #SRHvKKR | @KKRiders pic.twitter.com/x0G9NC8mHf
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2026
केवळ गोलंदाजीच नाही, तर नरेनने फलंदाजीतही आपला ठसा उमटवला आहे. त्याने १८२० धावा केल्या असून, त्याचा स्ट्राइक रेट १६५.३० असा जबरदस्त आहे. यामध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल इतिहासात १००० धावा आणि २०० विकेट्स असा दुहेरी विक्रम करणारा तो पहिला अष्टपैलू खेळाडू आहे.
टी-२० कारकिर्दीतही त्याने ५९१ सामन्यांमध्ये ६२१ विकेट्स घेतल्या आहेत, जे राशिद खान आणि ड्वेन ब्राव्हो वगळता इतर कोणत्याही खेळाडूंपेक्षा जास्त आहे. तीन वेळा आयपीएलचा ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ ठरलेला सुनील नरेन अजूनही या लीगचा सर्वात धोकादायक आणि विश्वासार्ह खेळाडू आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले.





