Abhishek Sharma Fined : अभिषेक शर्मावर बीसीसीआयची मोठी कारवाई! KKR vs SRH सामन्यातील ‘ती’ चूक पडली महागात
Abhishek Sharma Fined : केकेआरविरुद्धच्या सामन्यानंतर एसआरएचचा सलामीवीर अभिषेक शर्मा याला बीसीसीआयने मोठा दणका दिला आहे.

Abhishek Sharma Fined IPL 2026 Code of Conduct : आयपीएल २०२६ च्या सहाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सवर ६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला खरा, पण या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच सलामीवीर अभिषेक शर्माला बीसीसीआयने मोठा दणका दिला आहे. मैदानावरील गैरवर्तणुकीमुळे अभिषेकवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
बीसीसीआयची अभिषेकवर दंडात्मक कारवाई –
ईडन गार्डन्सवर गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने २२६ धावांचा डोंगर उभारून केकेआरला धूळ चारली. मात्र, या सामन्यात २१ चेंडूत ४८ धावांची वादळी खेळी करणाऱ्या अभिषेक शर्माने आपल्या वागणुकीने चाहत्यांना निराश केले आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिषेकच्या मॅच फीमधील २५ टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली आहे.
अभिषेक शर्माला बीसीसीआयकडून दंड ठोठावण्यात आला. (Abhishek Sharma Fined)
नेमकं कारण काय?
Sunrisers Hyderabad (SRH) opener #AbhishekSharma has been fined 25% of his match fee and received a demerit point for breaching the IPL Code of Conduct, following Thursday’s clash against Kolkata Knight Riders. @IPL | @SunRisers | @IamAbhiSharma4 | #IPL2026 #SRHvKKR #fine… pic.twitter.com/tjYm1M2n2T
— The Statesman (@TheStatesmanLtd) April 3, 2026
बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, अभिषेक शर्माने आयपीएलच्या आचारसंहितेतील अनुच्छेद २.३ अंतर्गत ‘लेव्हल १’चा गुन्हा मान्य केला आहे. हा गुन्हा सामना सुरू असताना मोठ्या आवाजात अश्लील किंवा असभ्य शब्दांचा वापर करण्याशी संबंधित आहे. ही घटना नेमकी कोणत्या षटकात घडली, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, अभिषेकने मॅच रेफ्रींचा निर्णय निमूटपणे मान्य केला आहे. दंडासोबतच त्याच्या शिस्तभंग पुस्तिकेत एक डिमेरिट पॉईंट देखील जमा झाला आहे.
हैदराबादने उघडले विजयाचे खाते –
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने ५२, अभिषेक शर्माने ४८ आणि ट्रॅव्हिस हेडने ४६ धावा कुटल्या. या त्रिकुटाच्या जोरावर हैदराबादने २२६ धावांचे विशाल लक्ष्य केकेआरसमोर ठेवले होते. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सचा डाव अवघ्या १६१ धावांवर आटोपला. केकेआरकडून आंगकृष रघुवंशीने (५२) झुंज दिली, पण जयदेव उनादकट आणि नितीश रेड्डी यांच्या अचूक माऱ्यापुढे कोलकात्याचा निभाव लागला नाही. हैदराबादने या विजयासह हंगामातील पहिले दोन गुण मिळवले असले, तरी अभिषेक शर्मावरील या कारवाईमुळे शिस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





