IND vs SA : ‘आमच्यात सुधारणा हवी’; अश्विनच्या टीकेनंतर केएल राहुलची कबुली! मान्य केली टीम इंडियाची ‘ती’ कमजोरी

स्पिनविरुद्ध कमकुवत होण्याची कारणे अज्ञात –
केएल राहुलने सांगितले, “आम्ही गेल्या काही सत्रांमध्ये स्पिन गोलंदाजी चांगली खेळलो नाही. आम्ही पूर्वी का खेळू शकलो आणि आता का खेळू शकत नाही, हे मला खरेच माहीत नाही. माझ्याकडे कोणतेही निश्चित उत्तर नाही.” याच चिंतेबद्दल बोलताना माजी फिरकीपटू आर. अश्विन यांनी अलीकडेच म्हटले होते की, फिरकीविरुद्धची भारताची खराब फलंदाजी त्यांना जगातील सर्वात कमकुवत फिरकीविरुद्ध खेळणाऱ्या संघांपैकी एक बनवत आहे.
𝗦𝗢𝗨𝗡𝗗 𝗢𝗡 🔊
🎥 High intensity and good vibes, ft. Rohit Sharma and Virat Kohli 🤝🔥#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @ImRo45 | @imVkohli pic.twitter.com/hT6hQ0NAmN
— BCCI (@BCCI) November 29, 2025
त्यांनी पुढे सांगितले की, खेळाडूंना तांत्रिक आणि धोरणात्मक बदल शोधावे लागतील आणि ही एक लांब प्रक्रिया असेल. “हे रातोरात बदलणार नाही. आम्ही सुधारणेच्या गरजा पाहू आणि आशा आहे की श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान आम्ही अधिक चांगल्या प्रकारे तयार असू. आम्ही त्या ज्येष्ठ खेळाडूंचा सल्ला घेऊ, ज्यांनी फिरकीविरुद्ध खूप चांगली खेळली आहे,” असे राहुल म्हणाला.
हेही वाचा – Jay Shah Award : महिला क्रिकेटला नवी दिशा देणारे जय शाह ‘उत्कृष्ट कामगिरी’ पुरस्काराने सन्मानित
विराट-रोहितची उपस्थिती महत्त्वाची –
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही संघात परतले आहेत, याबद्दल राहुलने आनंद व्यक्त केला. “वनडे फॉर्मेटमध्ये विराट कोहली स्ट्राइक रोटेशनमध्ये माहीर आहे आणि आम्ही सर्वजण त्याच्याकडून शिकत असतो. त्यांची उपस्थिती नेहमीच महत्त्वाची असते. ड्रेसिंग रूममध्ये सीनियर खेळाडू असल्यामुळे अधिक आत्मविश्वास मिळतो,” असे राहुलने सांगितले.
पंत बाहेर राहण्याची शक्यता?
ऋषभ पंतला पहिल्या वनडेत संधी मिळेल का, याबद्दल राहुलने निश्चितपणे काहीही सांगितले नाही. पंत फक्त फलंदाज म्हणून खेळू शकतो, असे राहुलने मान्य केले असले तरी, सरावादरम्यान राहुलने स्वतः यष्टिरक्षण केल्यामुळे, पंत प्लेइंग-११ चा भाग नसेल, असे संकेत मिळत आहेत.





