Kolkata team : आयपीएल सुरू होण्यापूर्वीच KKR ला मोठा झटका! ‘या’ खेळाडूची टीममधून एक्सिट
Kolkata team : आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच कोलकत्ता नाईट रायडर्स संघासाठी आणि चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Kolkata team : येत्या काही दिवसांत इंडियन प्रिमीयर लीग २०२६ ला सुरुवात होणार आहे. यंदाच्या लीगचा हा १९ वा सीझन असणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. या लीगसाठीचे पहिल्या दहा सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
अशातच लीग सुरू होण्यापूर्वीच कोलकत्ता नाईट रायडर्सच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. या संघातून एका खेळाडूने एक्सिट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे संघाला मोठा धक्का बसला आहे.
टीमचा प्रमुख वेगवान गोलंदाज हर्षित राणा आगामी आयपीएल ( IPL) सिझनमधून बाहेर पडला आहे. त्याच्या बाहेर पडण्याचे कारण समोर आले असून, फ्रँचायझी किंवा बीसीसीआयने मात्र याची अधिकृतपणे माहिती दिलेली नाही.
हेही वाचा : Baramati : बारामती नगरपालिकेत ‘महिला दिन’ उत्साहात साजरा; कायदेशीर प्रबोधन आणि सक्षमीकरणावर भर
केकेआरला आधीच मुस्तफिजूर रहमानच्या रूपाने एका धक्का बसला असतानाच हर्षित टीममध्ये नसणे याचा फटका संघाला बसू शकतो. संघाची गोलंदाजी लाइनअप अडचणीत येऊ शकते.
नेमकं कारण काय? Kolkata team
टी-२० वर्ल्डकपपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान हर्षित राणाला (harshit rana) गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानात परतला नाही. मुंबईत त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. मात्र अजून तो दुखापतीतून सावरू शकलेला नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळण्यासाठी हर्षित वेळेत बरा होऊ शकणार नाही अशी चर्चा आहे.

Harshit Rana IPL 2026
आयपीएल २०२४ च्या सिझनमध्ये कोलकात्याच्या टीमने विजयाची मोहर लावली. या विजयात २४ वर्षीय हर्षित राणाची महत्वाची भूमिका मानली जाते. त्याने सीझनमध्ये १९ विकेट्स घेतले होते. २०२५ च्या सिझनपूर्वी फ्रँचायझीने त्याला ४ कोटींमध्ये रिटेन केले. त्याने १३ सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या. त्याची कामगिरी उत्तम राहिली आहे.Kolkata team
दरम्यान, कोलकता नाईट रायडर संघाकडून अजूनही या अष्टपैलू खेळाडूच्या जागी कोणाला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे, हे स्पष्ट केलेले नाही. पण ब्लेसिंग मुजारबानीला संधी मिळण्याची शक्यता आहे. ब्लेसिंग हा वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे. त्याची वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे.
हेही वाचा : Crime News : शिरुर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी बनावटीच्या पिस्तुलासह 2 जण ताब्यात





