KKR GT Replacement : २८ मार्चपूर्वी केकेआरचा मोठा गेम! हर्षित राणाच्या जागी ७५ लाखात खरेदी केला ‘हा’ खेळाडू; गुजरातनेही केला बदल
KKR GT Replacement : आयपीएल २०२६ चा थरार सुरू होत असून, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अनेक संघांना दुखापतींचे ग्रहण लागले आहे.

KKR GT Replacement IPL 2026 : येत्या २८ मार्चपासून आयपीएल २०२६ चा थरार सुरू होत असून, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अनेक संघांना दुखापतींचे ग्रहण लागले आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि गुजरात टायटन्स (GT) या दोन संघांनी आपल्या ताफ्यात महत्त्वाचे बदल करत नव्या वेगवान गोलंदाजांची भरती केली आहे.
आयपीएलच्या १९ व्या हंगामापूर्वी खेळाडूंच्या दुखापतींनी फ्रँचायझींची डोकेदुखी वाढवली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा हुकुमी एक्का हर्षित राणा दुखापतीमुळे बाहेर पडल्याने केकेआरने अनुभवी नवदीप सैनी याला संधी दिली आहे, तर गुजरात टायटन्सने पृथ्वीराज याराच्या जागी कुलवंत खेजरोलियाला संघात सामील करून घेतले आहे.
हर्षित राणा बाहेर, नवदीप सैनी इन!
🚨 News 🚨
Navdeep Saini replaces Harshit Rana in @KKRiders; Kulwant Khejroliya joins @gujarat_titans in place of Prithviraj Yarra.
More details ▶️ https://t.co/C9KzGiMkmL
#TATAIPL pic.twitter.com/A9lU6GbpLX
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2026
केकेआरचा स्टार वेगवान गोलंदाज हर्षित राणा गुडघ्याच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. टी-२० विश्वचषक २०२६ पूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात तो जखमी झाला होता, तेव्हापासून तो सावरू शकलेला नाही. त्याच्या अनुपस्थितीत केकेआरने ३३ वर्षीय नवदीप सैनीला ७५ लाख रुपयांमध्ये करारबद्ध केले आहे. सैनीकडे ३२ आयपीएल सामन्यांचा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असून, डेथ ओव्हर्समध्ये तो कोलकातासाठी उपयुक्त ठरू शकतो.
गुजरात टायटन्समध्ये कुलवंत खेजरोलियाची एन्ट्री –
दुसरीकडे, गुजरात टायटन्सलाही दुखापतीचा फटका बसला आहे. वेगवान गोलंदाज पृथ्वीराज यारा जखमी झाल्याने त्याच्या जागी कुलवंत खेजरोलियाची निवड करण्यात आली आहे. कुलवंतला ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात स्थान मिळाले आहे. यापूर्वी त्याने आरसीबी आणि केकेआर यांसारख्या संघांचे प्रतिनिधित्व केले असून त्याच्या नावावर आयपीएलमध्ये ६ विकेट्स आहेत.
आयपीएलच्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून या दोन्ही बदलांची माहिती देण्यात आली आहे. आता हे नवे गोलंदाज आपल्या संघासाठी किती प्रभावी ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





