IPL 2026 पूर्वी ‘पेस अटॅक’ कोलमडला! स्टार्क, सॅम करनसह ७ दिग्गज गोलंदाज बाहेर; ‘या’ फ्रँचायझींना बसला दुखापतीचा फटका!
IPL 2026 : तब्बल ७ दिग्गज वेगवान गोलंदाज दुखापत आणि वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

IPL 2026 Ruled Out Players List : आयपीएल २०२६( IPL 2026) चा हंगाम २८ मार्चपासून सुरू होत असून, स्पर्धेपूर्वीच अनेक संघांच्या गोटात चिंतेचे ढग दाटले आहेत. तब्बल ७ दिग्गज वेगवान गोलंदाज दुखापत आणि वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून बाहेर पडले असून, यामध्ये ४ ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश असल्याने फ्रँचायझींचे समीकरण बिघडले आहे.
आयपीएलच्या १९ व्या हंगामाची उलटी गिनती सुरू झाली आहे. मात्र, मैदानात चेंडू पडण्यापूर्वीच वेगवान गोलंदाजांच्या माघारीमुळे खळबळ उडाली आहे. पॅट कमिन्स, सॅम करन आणि भारताचा युवा स्टार हर्षित राणा यांसारख्या ७ प्रमुख गोलंदाजांना दुखापतीमुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे माघार घ्यावी लागली आहे. यातील ६ खेळाडू केवळ दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत.
हे ४ गोलंदाज संपूर्ण हंगामाला मुकणार – IPL 2026

IPL 2026 Ruled Out Players List
यातील चार खेळाडूंना गंभीर दुखापतीमुळे पूर्ण आयपीएल २०२६ मधून बाहेर पडावे लागले आहे:
- हर्षित राणा (KKR): गुडघ्याच्या दुखापतीमुळे कोलकाता नाईट रायडर्सचा हा हुकुमी एक्का बाहेर पडला आहे.
- सॅम करन (RR): राजस्थान रॉयल्सने चेन्नईकडून ट्रेड केलेल्या या अष्टपैलू खेळाडूला मांडीच्या दुखापतीमुळे एकही सामना खेळता येणार नाही.
- नॅथन एलिस (CSK): हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्सला हा मोठा धक्का बसला आहे.
- जॅक एडवर्ड्स (SRH): पहिल्यांदाच आयपीएल खेळण्यासाठी सज्ज असलेल्या या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला दुखापतीमुळे आपले नाव मागे घ्यावे लागले आहे.
कमिन्स, हेझलवूड सुरुवातीच्या सामन्यांतून बाहेर – IPL 2026
काही संघांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे पॅट कमिन्स (SRH) आणि जोश हेझलवूड (RCB) हे केवळ सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकतील. दुखापतीतून सावरण्यासाठी त्यांना वेळ हवा असल्याने ते पहिल्या टप्प्यात खेळताना दिसणार नाहीत. तर, न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन (PBKS) राष्ट्रीय कर्तव्य आणि आपल्या नवजात मुलासोबत वेळ घालवण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात उपलब्ध नसेल.
वेगवान गोलंदाजांच्या या माघारीमुळे आता केकेआर, सीएसके आणि राजस्थान रॉयल्स यांसारख्या संघांना तातडीने ‘रिप्लेसमेंट’ शोधावे लागणार आहे.





