Accident News : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जातेगाव परिसरातील हॉटेल जय भवानीजवळ कार आणि हायवा ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात अवघ्या पाच महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. (Accident News) मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी येथील गमाजी नामदेव दुमसे हे आपल्या कुटुंबासह अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी कारने जात होते. करमाळा तालुक्यातील जातेगावजवळ त्यांच्या कारला हायवा ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. (Accident News) या अपघातात गमाजी दुमसे यांची पाच महिन्यांची मुलगी अनन्या गमाजी दुमसे हिचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Accident News) अपघाताची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. (Accident News) जळगावात मालगाडीच्या बोगीला आग दरम्यान, जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या एका बोगीला आग लागल्याची घटना घडली. रेल्वे पुलाजवळ धूर आणि ज्वाळा दिसताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (Accident News) अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग काही वेळात आटोक्यात आणण्यात यश आलं आणि मोठी दुर्घटना टळली. प्राथमिक माहितीनुसार, कोळशामधील उष्णता किंवा घर्षणामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असून रेल्वे प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. (Accident News)