Khavdya Dongar Case : आई-वडिलांना आयफोनसाठी ‘या’ निर्णयाला भाग पाडलं? अफवांवर कुणालच्या मावशीचा संताप, हात जोडून केली विनंती
Khavdya Dongar Case : खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सोशल मीडियावर विविध दावे आणि अफवा व्हायरल होत आहेत.

Khavdya Dongar Case : खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सोशल मीडियावर विविध दावे आणि अफवा व्हायरल होत आहेत. कुणालला मोबाईल किंवा आयफोन न मिळाल्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, या चर्चांवर कुणालची मावशी पल्लवी पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Khavdya Dongar Case)
पल्लवी पाटील यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत खोटी किंवा अपूर्ण माहिती पसरवू नका, अशी कळकळीची विनंती केली आहे. संगीता चांदगुडे या आपल्या मोठ्या बहिणी असून कुणाल आणि मुरलीधर यांना गमावल्यानंतर कुटुंबाची अवस्था अत्यंत कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं. (Khavdya Dongar Case)
‘मोबाईल न मिळाल्यामुळेच आई-वडिलांना…’ अशी चर्चा नको
सोशल मीडियावर कुणालला मोबाईल न मिळाल्यामुळे त्याने आई-वडिलांना या टोकाच्या निर्णयासाठी भाग पाडल्यासारख्या चर्चा सुरू असल्याचं पल्लवी पाटील यांनी म्हटलं. मात्र, घटनेची सत्य परिस्थिती माहीत नसताना अशा अफवा पसरवू नका, असं आवाहन त्यांनी केलं. (Khavdya Dongar Case)
“आज माझ्या बहिणीची, मेव्हण्याची आणि मुलाची राख सावडून घरी जात आहे. पण मोबाईलमध्ये पाहिलं तर एकामागून एक व्हिडीओ दिसत आहेत. आमचं काळीज खाली बसलं आहे,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली. (Khavdya Dongar Case)
‘आमच्या आई-वडिलांचाही विचार करा’
पल्लवी पाटील यांनी सांगितलं की, त्या चार बहिणी आहेत आणि त्यांच्या आई-वडिलांचं वय ७५ वर्षांपेक्षा अधिक आहे. कुटुंबातील मोठं लेकरू गमावल्याचा धक्का त्यांच्या आई-वडिलांना बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी कुटुंबाच्या दुःखाचा विचार करावा, अशी विनंती त्यांनी केली. (Khavdya Dongar Case)
‘सत्य माहिती नसेल तर व्हिडीओ बनवू नका’
कुणाल, संगीता आणि मुरलीधर यांच्याबाबत संपूर्ण माहिती किंवा घटनेची सत्यता माहीत नसताना आरोप करणारे व्हिडीओ बनवू नयेत, असं पल्लवी पाटील यांनी स्पष्ट केलं. (Khavdya Dongar Case)






