Parbhani Paper Leak : परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून व्हॉट्सॲपवर पाठवला; पर्यवेक्षिकेसह ५ जणांना अटक
Parbhani Paper Leak : परभणी येथे एका नर्सिंग स्कूलमध्ये परीक्षा सुरू झाल्यानंतर एका परीक्षा पर्यवेक्षिकेने आपल्या मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो आपल्या बहिणीला पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला.

Parbhani Paper Leak : परभणी येथे एका नर्सिंग स्कूलमध्ये परीक्षा सुरू झाल्यानंतर एका परीक्षा पर्यवेक्षिकेने आपल्या मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो आपल्या बहिणीला पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. (Parbhani Paper Leak)
हा गैरप्रकार इंदिरा गांधी ए.एन.एम. नर्सिंग स्कूलमध्ये जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची परीक्षा सुरू असताना शुक्रवारी घडला. या प्रकरणी पोलिसांनी परीक्षा पर्यवेक्षिका राखी चव्हाण, तिची बहीण राणी चव्हाण, प्रतीक्षा खिल्लारे, ईश्वर बारबोईना आणि दिलीप बोरकर या आरोपींना अटक केली. (Parbhani Paper Leak)
पोलिसांच्या माहितीनुसार, परभणी येथील परीक्षा केंद्रावर नियुक्त असलेल्या राखीने सकाळी १०.३० वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच आपल्या मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला आणि तो व्हॉट्सॲपद्वारे आपल्या बहिणीला पाठवला. (Parbhani Paper Leak)
केंद्रीय निरीक्षकांनी केलेल्या तपासणीदरम्यान हा गैरप्रकार उघडकीस आला. परीक्षा सुरू असतानाच प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर पाठवली गेल्याचा संशय आल्याने केंद्र निरीक्षक विश्वजित मठपती यांनी संबंधित महिला पर्यवेक्षिकेची झडती घेतली आणि तिच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात प्रश्नपत्रिकेचा फोटो आढळून आला. (Parbhani Paper Leak)
ही परीक्षा कोणत्याही व्यत्ययाशिवाय नियोजित वेळापत्रकानुसार पार पडली. पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली आणि केंद्र निरीक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (Parbhani Paper Leak)
NEET-UG Paper Leak: NEET-UG पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट ; NTA चे तीन तज्ज्ञ CBI च्या जाळ्यात





