Tulika Maan Suspended : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताला दुसरा मोठा धक्का! बर्मिंघमची ‘रौप्यकन्या’ तुलिका मान निलंबित; संघातून हकालपट्टी
Tulika Maan Suspended : भारताची स्टार ज्युडोका आणि २०२२ च्या बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्य पदकविजेती तुलिका मानहिलाही भारतीय संघातून तडकाफडकी बाहेर काढण्यात आले आहे.

Judoka Tulika Maan Suspended NADA Whereabouts Failure Commonwealth Games 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी (Commonwealth Games 2026) भारतीय ज्युडो संघाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. गुरुवारी ज्युडोपटू अरुण कुमार डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यानंतर, आता भारताची स्टार ज्युडोका आणि २०२२ च्या बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्य पदकविजेती तुलिका मान (Tulika Maan) हिलाही भारतीय संघातून तडकाफडकी बाहेर काढण्यात आले आहे. राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीने (NADA) १२ महिन्यांच्या कालावधीत तीनदा ‘वेअरअबाउट्स’ (Whereabouts – मुक्कामाची माहिती) सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे तुलिकाला तात्पुरते निलंबित केले आहे.
दोन वर्षांच्या बंदीची टांगती तलवार –
२७ वर्षीय तुलिका मान ७८ किलोहून अधिक वजनी गटात भारताची पदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. वाडा (WADA) आणि नाडा (NADA) च्या नियमांनुसार, ‘रजिस्टर्ड टेस्टिंग पूल’ (RTP) मध्ये असणाऱ्या खेळाडूंना दररोज ६० मिनिटांचा स्लॉट आणि राहण्याचे ठिकाण कळवणे बंधनकारक असते. १२ महिन्यांत सलग तीनदा माहिती न दिल्यास हा डोपिंग विरोधी नियमांचा भंग मानला जातो. या निष्काळजीपणासाठी आता तुलिकावर दोन वर्षांची कडक बंदी लादली जाऊ शकते.
🚨 Birmingham Commonwealth Games silver-medallist judoka Tulika Maan has been withdrawn from the ongoing Glasgow edition after being handed a provisional suspension by the National Anti-Doping Agency (NADA) for three whereabouts failures in the last 12 months.
👉 Maan had won… pic.twitter.com/d9DY3woJnq
— Sportstar (@sportstarweb) July 24, 2026
ग्लास्गो रवाना होण्यापूर्वीच भारतीय संघ अडचणीत –
🚨 India’s Commonwealth Games 2026 contingent reduced to 123 athletes.
Three athletes will miss the Games:
❌ Arun Kumar (Judo) – Failed dope test
❌ Tulika Maan (Judo) – Under provisional suspension
❌ Dilbag Singh (Weightlifting) – Withdrawn due to a back injuryIndia’s… pic.twitter.com/AP5wpKJvRW
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) July 24, 2026
भारतीय ज्युडो संघाचे सामने ३१ जुलैपासून सुरू होणार असून, संघ २७ जुलै रोजी ग्लास्गोसाठी रवाना होणार होता. मात्र, प्रवासापूर्वीच दोन मुख्य खेळाडू (अरुण कुमार आणि तुलिका मान) बाहेर पडल्याने १४ सदस्यीय ज्युडो संघाला मोठा फटका बसला आहे. तुलिका ही पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भारतीय संघाची सदस्य राहिली आहे.
२०२२ च्या बर्मिंघम राष्ट्रकुलमध्ये भारतीय ज्युडो पथकाने २ रौप्य आणि १ कांस्य अशी ३ पदके जिंकली होती, मात्र यंदा सुरुवातीलाच लागलेल्या या ग्रहाणामुळे भारताची पदकांची संख्या घटण्याची भीती निर्माण झाली आहे.





