India Weightlifting Shock : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये भारताला धक्का! डोपिंगमुळे थेट कोटाच घटवल्याने दिलबाग सिंह बाहेर
India Weightlifting Shock : ज्युडोपटू अरुण कुमारच्या निलंबनानंतर आता भारतीय भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) संघाला मोठा आंतरराष्ट्रीय फटका बसला आहे.

India Weightlifting Shock Dilbagh Singh Out Doping Commonwealth Games 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी (Commonwealth Games 2026) भारतीय क्रीडा जगतातील डोपिंगचे (Doping) काळे सावट अधिक गडद झाले आहे. ज्युडोपटू अरुण कुमारच्या निलंबनानंतर आता भारतीय भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) संघाला मोठा आंतरराष्ट्रीय फटका बसला आहे.
पात्रता कालावधीत अनेक भारतीय खेळाडूंनी डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन (ADRV) केल्यामुळे भारताचा वेटलिफ्टिंग कोटा १६ वरून थेट ११ पर्यंत कमी करण्यात आला आहे. या कारवाईमुळे स्टार भारोत्तोलक दिलबाग सिंह (Dilbagh Singh) याला भारतीय संघातून तडकाफडकी बाहेर काढण्यात आले आहे. (India Weightlifting Shock)
१२ खेळाडूंची घोषणा, पण कोट्यात झाली कपात! (India Weightlifting Shock)
भारतीय भारोत्तोलन महासंघाने (IWF) ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती मीराबाई चानूच्या नेतृत्वाखाली १२ सदस्यीय संघाची घोषणा केली होती. मात्र, महासंघाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून कोटा केवळ ११ खेळाडूंचाच मिळाल्याची धक्कादायक माहिती बुधवारी मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “दिलबाग सिंह सध्या पाठीच्या दुखापतीशी झगडत असून त्याने बर्मिंगहॅममधील सराव शिबिरातही भाग घेतला नव्हता. त्यामुळे कोटा कमी झाल्यावर त्यालाच संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.”
Despite no fault of his own, weightlifter, Dilbag Singh, was withdrawn from India’s 2026 CWG campaign. @Boriamajumdar weighs in on the controversy.@SPREINDIA #cwg2026 pic.twitter.com/KjW5hL0iFM
— RevSportz Global (@RevSportzGlobal) July 24, 2026
या खेळाडूंवर आधीच लागलीये बंदी! (India Weightlifting Shock)
याआधी पात्रता फेरीदरम्यान एन. अजित (७१ किलो), साईराज परदेशी (८८ किलो) आणि हरचरण सिंह (११० किलो) या पुरुष खेळाडूंना डोपिंगमुळे प्रतिबंधित करण्यात आले होते. तसेच महिला खेळाडू वंशिता वर्मा (८६ किलो) ही देखील डोपिंग चाचणीत दोषी आढळली होती. या सलग प्रकरणांमुळे भारतावर ही कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय वेटलिफ्टिंगला मोठा धक्का – (India Weightlifting Shock)
हा निर्णय भारतीय वेटलिफ्टिंगसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीही अनेकदा डोपिंगच्या प्रकरणांमुळे या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी आणि दंडात्मक कारवायांना सामोरे जावे लागले आहे. यामुळे यंदाच्या राष्ट्रकुलमधील भारताच्या पदकांच्या संख्येवर थेट परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे.





